आपल्या सर्वांना माहीतच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अथक प्रयत्न करून भारतामध्ये जगातील सर्वात मोठी लोकशाही रुजवण्यात यशस्वी झालेत. जर संविधान निर्मितीचे कार्य कुण्या धर्मवेड्या व्यक्तीकडे असते तर भारत देशात अराजकता माजवून नक्कीच देश हा विनाश तिकडे वळला असता याचे अनेक उदाहरण आपल्याला देता येतील
आपण महत्त्वाची आणि थोडक्यात माहिती पाहणार आहोत एक फोटो आपल्याला 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन आणि 26 नोव्हेंबर सविधान दिनला अनेक लोकांच्या व्हाट्सअप स्टेटस वर आणि फेसबुक वर व इतर सोशल मीडियाला दिसतो की भारतीय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले नसून ते प्रेम बिहारी रायजादा यांनी लिहिलेले आहे परंतु त्याच लोकांचे आणखी पण म्हणणे आहे की भारतीय संविधान ची निर्मिती बाबासाहेब आंबेडकर यांनी एकट्यानेच केलेली नसून संविधान हे 284 जणांनी मिळून लिहिलेले आहे आणि त्याच लोकांचे यावर सुद्धा समाधान झाले नाही व त्यांनी पुढे असे म्हणतात की जेव्हा त्यांना (मसुदा समिती अशी कोणती समिती माहित होते) तेव्हा ते म्हणतात की भारतीय संविधानाची निर्मिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली नसून मसुदा समितीमध्ये आणखी सात सदस्य होते आंबेडकरांच्या म्हणण्यानुसार त्या सात सदस्यांनी भारतीय संविधानाची निर्मिती केलेली आहे असेच काही व्हाट्सअप युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थी/ कार्यकर्ते ज्यांना त्यांना सांगत फिरत असतात व त्यांच्या पलीकडे त्यांना काहीही माहिती नसते काही विचारवंत असे पण येतात की ज्यांनी संविधान किंवा इतर साहित्य वाचन केलेले असणार किंवा नसणार परंतु त्यांचे एक मनाने असते की सविधान ही इतर देशांची पूर्णतः नकल आहे किंवा इंग्रजांच्या कायद्याची नक्कल आहे काही धर्म वेळे लोक किंवा देशभक्तीच्या नावावर जे द्वेष पसरवितात त्यांचे असे म्हणणे आहे की संविधानामध्ये देवी देवतांची चित्रे काढलेली आहेत म्हणून भारत देश हा धर्मनिरपेक्ष नसून संविधान हे हिंदुराष्ट्र बनविण्यासाठी प्रोत्साहन करत आहे आज आपण याच महत्त्वाच्या काही प्रश्नांची उकल करणार आहोत
पहिला प्रश्न पाहू भारतीय संविधानाची निर्मिती बाबासाहेब आंबेडकर यांनी एकट्यानेच केलेली नसून 284 सदस्यांनी हे संविधान मिळून लिलेले आहे?
--> याची उकल पाहू की संविधान लिहून पूर्ण झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 4 नोव्हेंबर 1948 रोजी संपूर्ण संविधान घटनेचा मसुदा हा संविधान सभेत मांडला या संविधान मसुद्याचे तीन वेळेस वाचन व चर्चा झाल्यानंतर 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताचे संविधान स्वीकृत करण्यात आले संविधानाच्या प्रस्ताविकतेमध्ये सुद्धा या तारखेचा उल्लेख केल्याचे आढळते व त्याच दिवशी या संविधान सभेचे संविधान सभेत उपस्थित असलेल्या 284 सदस्यांनी संविधानावर सह्या केल्या. हे 284 संविधान सभेचे सदस्य यांनी कोणत्याही प्रकारे संविधान लिहिलेले नाही फक्त ते संविधानाची स्वीकृती करतेवेळी उपस्थित होते जसे की गावातील ग्रामसभेला गावातील इतर नागरिक उपस्थित राहिल्यास ते उपस्थित होते म्हणून त्यांच्या सह्या घेतल्या जातात त्याचप्रमाणे संविधान स्वीकृती वेळी 284 सदस्य फक्त उपस्थित होते. त्यांचा व घटना तयार करण्यात परस्पर कोणताही संबंध दिसून येत नाही भारतातील प्रथम व्यक्ती ज्यांनी संविधानावर स्वाक्षरी केली ते म्हणजे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू तर संविधानावर स्वाक्षरी करणाऱ्या प्रथम महिला रेणुका रे या होत्या सर्वात शेवटची स्वाक्षरी भारताचे प्रथम राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी केली.
आता आपण आपला दुसरा महत्त्वाचा प्रश्न पाहू की -->
संविधान निर्मितीसाठी मसुदा समितीची स्थापना करण्यात आली होती. त्यामध्ये एकूण सात सदस्य होते म्हणून संविधान हे फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकट्याने लिहिलेले नाही.
... यासारख्या पोस्ट किंवा कमेंट आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळतात किंवा वाचायला मिळतात हे तर आपल्याला सुद्धा माहिती आहे की मसुदा समितीमध्ये एकूण सात सदस्य होते व मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते
आता या प्रश्नांची आपण संपूर्ण उकल पाहू की...
प्रथम पाहू की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेत कसे निवडून आलेत. बाबासाहेब आंबेडकर प्रथम बंगालमधून संविधान सभेत निवडून आले परंतु भारताचे फाडणे झाल्यामुळे बाबासाहेब ज्या जागेवरून निवडून आले होते ती जागा पाकिस्तान मध्ये गेली. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर बॉम्बे प्रेसिडेन्सी मधून जेष्ठ कायदे तज्ञ जयकर यांच्या जागेवर निवडून आलेत आणि बाबासाहेब आंबेडकर स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री बनले. आणि त्यांच्यावर भारताची नवीन राज्यघटना लिहिण्याची जबाबदारी सोपविण्यात आली.
संविधान सभेतील सर्वात महत्त्वाची समिती ज्या समितीवर भारताचे पुढील भवितव्याची जबाबदारी देण्यात आली होती ती समिती म्हणजे मसुदा समिती मसुदा समितीचे अध्यक्ष स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना बनविण्यात आले होते. मसुदा समितीमध्ये एकूण सात सदस्य होते.
१) डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर (मसुदा समितीचे अध्यक्ष)
२) एन जी गोपाळ स्वामी अय्यंगार
३) अल्लादी कृष्ण स्वामी अय्यर
४) सय्यद अहमद सादुल्लाह (आसामचे पंतप्रधान)
५) डॉ. के. एम. मुंशी
६) एन. माधवराव
७) टी. टी. कृष्णमाचारी (डी.पी. खेतान यांच्या मृत्यूमुळे टी. टी. कृष्णमाचारी यांची नियुक्ती करण्यात आली होती)
मसुदा समितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना धरून सात सदस्यांची समिती होती. तरीपण बाबासाहेब आंबेडकरांनाच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार किंवा जनक का म्हणतात ते आपण पाहू...
सात सदस्यांपैकी एका सदस्याचा मृत्यू झाला. त्यामुळे त्या सदस्यांचे पद कितीतरी महिने खाली होते. बाबासाहेब आंबेडकर सर्व सदस्यांपैकी वयाने सर्वात लहान होते त्यामुळे जास्त वय झालेले सदस्य नेहमी आजारी राहत होते. त्यामुळे एका सदस्यांनी आजारपणाचे कारण समोर करून मसुदा समितीचा राजीनामा दिला आणि नवीन सदस्यांची नियुक्ती करणे यामध्ये सुद्धा खूप वेळ गेला आणि महत्त्वाचे म्हणजे की सर्वच सदस्य हे कायदेतज्ञ होते असे सुद्धा नव्हते म्हणून सविधान निर्मितीत बाबासाहेब आंबेडकरांचा सिंहाचा वाटा होता हे नाकारता येणार नाही.
आता आपण महत्त्वाचा तिसरा प्रश्न पाहू की...
भारतीय संविधान प्रेम बिहारी रायजादा यांनी लिहिले काय?
---> सव्वीस नोव्हेंबर संविधान दिवस असो किंवा प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी असो एक मेसेज प्रत्येक ठिकाणी आपल्याला फिरताना दिसतो की भारतीय मूळ संविधान हे बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले नसून प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी लिहिलेले आहे. असे पोस्ट जे वायरल करतात त्यांचे समजू शकतो की त्यांच्या रक्तात आंबेडकर द्वेष ठासून भरलेला आहे. परंतु गुगल सुद्धा हेच सांगतो की भारतीय मूळ संविधान प्रेम बिहारी रायजादा यांनी लिहिलेले आहे. आता आपण या प्रश्नांची उकल करण्याचा प्रयत्न करू...
(आपण आपल्याला चैनल वर नवीन असाल तर अशीच वेगवेगळ्या विषयावरील महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब नक्की करा व व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट नक्की करा व आपल्याला नवीन व्हिडिओ कशा संबंधित हवा ते सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये सांगा....)
प्रेम बिहारी रायजादा हे संविधान सभेतील 299 सदस्यांपैकी एक होते असे सुद्धा नाही किंवा आपण मागे पाहिलेलेच आहे की भारतातील संविधान निर्मितीसाठी निर्माण करण्यात आलेली मसुदा समिती त्यामध्ये सुद्धा प्रेम बिहारी रायजादा यांचे नाव वाचण्यात आलेले नाही. म्हणजेच याचा अर्थ असा होतो की संविधान सभा किंवा मसुदा समिती यांचा संबंध कोठेही प्रेम बिहारी रायजादा यांच्या सोबत जोडता येणार नाही तर मग प्रेम बिहारी रायजादा कोण आहेत व त्यांनी मूळ संविधान लिहिले अशा पोस्ट का व्हायरल होत आहेत.
प्रेम बिहारी नारायण रायजादा हे दिल्लीमधील सेंट कॉलेजमधील शिक्षक होते ते एक उत्तम सुलेखक सुद्धा होते. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी प्रेम बिहारी रायजादा यांची भेट घेऊन भारतीय संविधानाची जी मूळ प्रत आहे म्हणजेच बाबासाहेब आंबेडकरांनी जे मसुदा समितीद्वारे जो मसुदा तयार केला व त्यावर 284 सदस्यांच्या स्वाक्षऱ्या झालेल्या होत्या म्हणजेच मूळ संविधान हे सुलेखन आजच्या भाषेत म्हणायचे झाले तर ( द आर्ट ऑफ कॅलिग्राफी ) संविधान हे सुलेखन द्वारे हस्तलिखित लिहिण्यास सांगितले येथे आपला प्रश्न स्पष्ट झालेला आहे की प्रेम बिहारी रायजादा हे फक्त सुलेखनकार होते त्यांचा आणि भारतीय संविधान निर्मितीचा कोणताही संबंध नाही महत्त्वाचे सांगायचे झाल्यास प्रेम बिहारी रायजादा यांची नेमणूक ही मतदानाद्वारे किंवा विशिष्ट पद्धतीद्वारे केल्या गेलेली नाही तर पंडित नेहरू यांच्या सांगण्यावरून संविधानाचे सुलेखन केले या ठिकाणी अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होऊ शकतो की राजदादा यांची जात कोणती आहे?
येथे सांगू इच्छितो की रायजादा यांची जात कायस्थ सक्सेना असून उच्च वर्ण किंवा ब्राह्मण यांच्याच बरोबरीती ही सुद्धा एक जात आहे.
पुढील काही प्रश्नांची उकल पाहण्यासाठी लवकरच पार्ट टू सुद्धा येणार आहे भारतीय मूळ संविधान मध्ये असलेले देवी देवतांचे फोटो हे धर्मनिरपेक्ष देशात हिंदू राष्ट्र बनवण्यासाठी प्रोत्साहन आहे का भारतीय संविधान हे इतर देशांशी नकल आहे का आपण या प्रश्नांचे उत्तर सुद्धा पाहणार आहोत..