सहदेव भांडळी ( भाग एक ) :-
सहदेव भांडळी हा ग्रंथ हवामानाचे निरीक्षण कशा प्रकारे करता येईल, या आधारावर या ग्रंथाची निर्मिती करण्यात आलेली आहे. भारतात प्राचीन काळापासून ज्योतिष विद्या प्रचलनात आहे . हवामान पाऊस पाणी तसेच आपल्या भविष्याविषयी जाणून घेण्याची प्रत्येकालाच उस्तुकाता असते , आपल्या भविष्यात काय होईल तसेच चिन्हांच्या आधारे शुभ किंवा अशुभ समजल्या जाणाऱ्या काही परंपरा आज सुद्धा प्रचलनात आहेत याचं आधारावर निर्मितीस आलेला ग्रंथ सहदेव भांडळी या ग्रंथाविषयी आपण माहिती पाहू
सहदेव भांडळी ही कथा बाराव्या शतकातील असून मार्तंड ज्योतिष नावाच्या एका ब्राम्हण ज्योतिषाला एका शूद्र समाजातील स्त्री पासून झालेली मुलगी व त्या मुलीचा सावत्र भाऊ सहदेव या दोन भाऊ बहिनिपासून सहदेव भांडळी ही प्रसिद्ध कथा ओळखली जाते .
मार्तंड ज्योतिष नावाचे एक विद्वान ज्योतिषी होते काही कामानिमित्त ते बाहेर गावी गेले असता त्याच दिवशी त्यांना परत गावाकडे जायचे होते परंतु रस्ता हा जंगलातून असल्या कारणाने व त्यांना गावाकडे परत येताना खूप उशीर झाला असल्याने त्यांनी जंगलातील एका झोपडीमध्ये थांबण्याचा विचार केला , त्या झोपडीमध्ये एक मुलगी व त्या मुलीची म्हातारी आई राहत असे . त्या रात्रीला मार्तंड ज्योतिषी खूप अस्वस्त होता त्या म्हाताऱ्या महिलेने मार्तंड ज्योतिषी ला अस्वत असण्याचे कारण विचारले असता , मार्तंड ज्योतिषी सांगू लागला की मला परमेश्वराचे असे काही संकेत मिळाले आहेत की , मी आज ज्या पण महिलेसोबत समागम करून पुत्र प्राप्ती करेल तो पुत्र खूप तेजस्वी होऊन ज्योतिष शास्त्रात खूप मोठे नाव लौकीक करेल पण मी आज या जंगलात अडकलेला असल्या कारणाने त्या संधीचा मला लाभ घेता येणार नाही , हे सांगत असताना मार्तंड ज्योतिषी अस्वस्थ होत होता . हे सर्व ऐकून त्या म्हाताऱ्या महीलेणे आपल्या अविवाहित मुलीकडे बोट दाखवत गर्भधारणा करण्याची परवानगी दिली , दुसऱ्या दिवशी ब्राम्हण आपल्या राहत्या घरी परत आला .
काही महिन्यांनी त्या झोपडीतील महिलेचा गर्भधारणा होऊन तिला ब्राह्मणापासून मुलगी झाली , आणि सर्वच निराश झाले त्या मुलीचे नाव भांडळी असे ठेवण्यात आले , आणि ब्राम्हणाला त्याच्या पत्नीपासून मुलाचा जन्म झाला व त्याचे नाव सहदेव असे ठेवण्यात आले , मार्तंड ब्राम्हणाने त्या मुलीला आपल्याकडेच ठेऊन घेतले व त्या मुलीची ( भांडळी ) ची देखील देखभाल करू लागला .
मार्तंड ब्राम्हण आपल्या मुलाला सहदेवाला ज्योतिष शास्त्राचे शिक्षण देत असताना त्याच्या शेजारी भांडळी येऊन बसायची व ज्योतिष शास्त्राचे संपूर्ण ज्ञान हे सहदेव पेक्षा अधिक गतीने आत्मसात करायची . एके दिवशी ज्योतिष ज्ञानाचे शिक्षण घेत असताना सहादेवचे व भांडळी चे वडील मार्तंड ज्योतिषी यांचा मृत्यू झाला होता. सहदेवाला त्रीलोक ज्ञान ही विद्या प्राप्त झाले नाही , म्हणून तो फार दुखी झालेला होता परंतु सहदेवाने दुखी होऊन राहण्यापेक्षा आपल्याला त्रिलोक ज्ञान कसे प्राप्त होईल याचा शोधात राहत होता. एके दिवशी सहदेव त्रीलोकं ज्ञान प्राप्त करण्यासाठी नावाजलेल्या संत पुरुषाच्या शोधात पैठण मधील साधू जवळ जाऊन आपल्या मनातील इंच्या प्रकट केली , परंतु त्या साधूला सुद्धा ही त्रीलोल ज्ञान विद्या प्राप्त झालेली नव्हती म्हणून साधूने असमर्थता दर्शवत सहदेव ला सांगितले की, मला ही विद्या प्राप्त झालेली नाही परंतु माझे गुरु यांना त्रीलोक ज्ञान ही विद्या प्राप्त झालेली होती , परंतु दुर्दैवाने ते आपल्यात नाहीत .
सहदेव भांडळी क्लिक करा..
उर्वरित कथा भाग दोन मध्ये ..