विद्रोही साथीदार
जगायचा विचार केला अन् मरणाचा विचार खटकत होता
रक्त हे उसळत होते अन् विद्रोह हा होत होता
आवाज मी ऐकला तेथे निअपराध जीवांचा
कत्तल खाने फार झाले अन् रंगारंगातील झेंड्याचा माज होता
थाटलो नाही मी तिथेही माझ्यातील पुरुष जागा व्ह्यायचा होता
हे जाती धर्माचे सरकार हर एक बेरोजगार येथे पेटून उठणार होता
सांग मोजणार का तू माझ्यातील बंडखोर पणा
येथे प्रतेक धार्मिक चळवळीमध्ये संविधानाचा जयघोष होत होता
लपवू नकास चेहरे जाती धर्माच्या नावाखाली
येथे प्रतेक साथीदार माझा विद्रोही होत होता
येथे प्रतेक साथीदार माझा विद्रोही होत होता ..
नामवंत पवन प्रभे ( अमरावती )
मो ८०१०८४४८४३
#नामवंत_प्रभे #विद्रोही_कविता