तिचे आधुरे स्वप्न
तिचे अधूरे स्वप्न
शरीराचा बाजार मांडला की काय
सौंदर्यच संपुष्टात आले
आलीच गरीबाची मुलगी वयात
तिच्या बापाच्या हृदयाचे ठोके
संपुष्टात आले...
कोण्या श्रीमंतांची नजर
पडलीच तिच्यावर तर
तिचे दिवस भरून आले...
केलीच तिने त्याच्याशी
लग्न करण्याची विनवणी
भर कोर्टात ती वैश्यां असल्याचे
सबुत धाऊन आले...
कोण्या काळी बापाच्या नजरेत
देवी असलेली मुलगी समाजाच्या गल्लीतून
जेव्हा हिनवल्या जाते...
सांगा त्या बापाचे काळीज
कुठ दम तोडते...
सांगा त्या बापाचे काळीज
कुठ दम तोडते...
हसता खेळता परिवार
जेव्हा तुटून जातो
सांगा त्या लेकीची इज्जत
कुठ हरवुन जाते..
स्मशानाच्या चितेवर की
श्रीमंतांच्या खाटेवर..
की अशीच समाजाच्या नजरेत
नीच प्रवृत्तीची जात
होऊन जाते...
की अशीच समाजाच्या नजरेत
नीच प्रवृत्तीची जात होऊन जाते...
तिचा बाप आता
फारसा काही बोलत नाही
दारू सोडून दुसरे काहीच
तो पित नाही...
लग्नाचं वय निघून गेलेली मुलगी
शरीराची जेव्हा भूक भागविते
दिवसाप्रमाणे माणसे बदलून जातील
मात्र नवऱ्याचे स्वप्न हे
तिच्या नजरेत अधुरेच राहते..
मात्र नवऱ्याचे स्वप्न
तिच्या नजरेत अधुरेच राहते....
नामवंत पवन... ( अमरावती )
८०१०८४४८४३
फोटो :- google