विद्रोही संविधान कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
विद्रोही संविधान कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, १० एप्रिल, २०२२

भारतीय संविधान पुन्हा बाबासाहेबांच्या लेखणीतून

भारतीय संविधान पुन्हा बाबासाहेबांच्या लेखणीतून
अश्रूंना पुर यावा
व्हावी अब्रुंची नीलामी
येथे प्रतेक गुन्हेगार मोकाट सुटावा
स्त्रियांची भर चौकात अब्रू लुटावी
एवढेच नाही तर..
घराघरात घुसून इज्जतीचे धींगाणे करावे 

त्या गरीब व शांत स्त्रियांची 
गावागावातून नग्न धिंड काढावी
त्यांच्या शरीरासोबत प्रत्येकाने खेळावे 
मंदिर मस्जिद सर्वच प्रार्थना स्तळांवर बंदी यावी ..

चौका चौकात कब्रे डान्स सुरू व्हावा 
प्रबोधन करणाऱ्यांवर अंधाधुंद गोळ्या झाडाव्यात 
बुद्ध फुले शाहू आंबेडकर पेरियार 
यांच्या मूर्तीची विटंबना व्हावी 
एवढेच नाही तर....
मुर्त्या तोडून फोडून पायदळी तुडवून 
मूर्तीचे व विचारांचे भुगा बनवावे ..

सतीप्रथा व बहुपत्नीत्व या चालीरीती पुन्हा सुरू व्हाव्यात 
घराघरांतून रांडी खाणे सुरू व्हावे 
लहान मोठ्यांनी सिगारेट दारूचे भरपूर सेवन करावे ...
संपूर्ण देशात AIDS , HIV सारख्या बिमारिने थैमान घालावे
एकदिवसाच्या बाळापासून तर १०० वर्षाच्या असणाऱ्या माणसांचे पटापट मूर्दे पडावेत.....

भारतात माणूस नाममात्र शिल्लक रहावा 
तो ही सडलेला कुजलेला मळलेला 
आणि.....
आणि ..... एक दिवस ....
आणि एक दिवस नवीन सूर्य उगवावा 
जेथे माणसामाणसांचा बाट होईल 
त्या माणसांना व त्या जागेला 
तिथेच जाळून खाक करावे ...

एक नवीन पिढी यावी 
एका नवीन संस्कृतीने जन्म घ्यावा 
जेथे माणूस सोडून कोणालाच जागा शिल्लक नसावी ..
जेथे माणसांपासून सुरुवात तर 
माणसानं जवळच शेवट व्हावा
जेथे स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार होईल 
जिथे अन्यायाच्या विरूद्ध चीड तर 
शोषितांच्या विरूद्ध न्याय होईल 
हो एक नवीन संविधान 
नव्या विद्रोहासोबत तयार होईल

एक नवीन लेखणी एक नवीन संविधान तयार व्हावे ....

जेथे सार्वभौम , समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा प्रयत्न व्हावा ...
जेथे सामाजिक आर्थिक राजनैतिक न्याय विचार अभीव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वतंत्र असावे.... 

जेथे संधीची समानता असावी  जेथे व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता एकात्मता असायलाच हवी 
प्रेम दया शांती यांचे संरक्षण करणारी बंधुता असायलाच हवी 

अर्थात... नवीन सामाजिक संरचना नवीन भारताचे संविधान पुन्हा बाबासाहेबांच्या लेखणीतून .., न्याय स्वतंत्र समानता बंधुता यांचे संरक्षण करणारे हवे...

मला भारतीय संविधान ...
       माणसाने माणसासाठी मिळविलेले स्वतंत्र जगण्यासाठी हवे 

हो मला भारतीय संविधान पुन्हा बाबासाहेबांच्या क्रांतिकारी लेखणीतूनच हवे 
हो मला भारतीय संविधान पुन्हा बाबासाहेबांच्या क्रांतिकारी लेखणीतूनच हवे. .   जय भीम

कवी :- नामवंत प्रभे ( अमरावती ) 
मो ८०१०८४४८४३

भारताचे संविधान कोणी लिहिले? प्रेम बिहारी नारायण रायजादा/ संविधान सभा/ मसुदा समिती

आपल्या सर्वांना माहीतच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अथक प्रयत्न करून भारतामध्ये जगातील सर्वात मोठी लोकशाही रुजवण्यात यशस्वी झालेत. जर...