मराठी कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मराठी कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, ५ मार्च, २०२२

जात नाही , मराठी विद्रोही कविता

जात नाही
रंगात जात नाही
झेंड्यात जात नाही
सलाम ठोक तिरंग्याला
मग तुझ्या इमानदारीत जात नाही..

कधी कुठे कसा 
लोकशाहीवर बलात्कार होतो
गर्दीत माणसांच्या 
माणसाची जात नाही

घोटाळे रोजच होते
रोजच अब्रू लुटली जाते
स्वयंघोषित देशभक्तांनो
रक्तात तुमच्या देशभक्तीची जात नाही

मागे मागे फिरणाऱ्या 
कुत्र्याच्या वंशजांनो 
घरी भाकरीला पीठ नाही
मग तुझ्या स्वाभिमानात जात नाही

कुठ रडतोस कुठ पडतोस
जाती धर्माच्या नावाखाली माणसाला कुरतडतोस

देशाला धर्म बनव
संविधानाला धर्मग्रंथ 
मग तुझ्या कोणत्याही धर्मात 
मग तुझ्या कोणत्याही गिर्मात
कोणतीच जात नाही


        नामवंत प्रभे 

Video पूर्ण कविता :-.    येथे क्लिक करा

भारताचे संविधान कोणी लिहिले? प्रेम बिहारी नारायण रायजादा/ संविधान सभा/ मसुदा समिती

आपल्या सर्वांना माहीतच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अथक प्रयत्न करून भारतामध्ये जगातील सर्वात मोठी लोकशाही रुजवण्यात यशस्वी झालेत. जर...