बोधिसत्व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळा प्रवेश दिवस हा महाराष्ट्रातील विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.
महाराष्ट्रातील शिक्षण विभागाने १७ ऑक्टोंबर २०१७ रोजी घेतलेल्या निर्णय मध्ये असे सांगण्यात आलेले आहे की , डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळा प्रवेश दीन निमित्त शाळा कॉलेज तसेच इतर ठिकाणी बाबासाहेब यांचा वैचारिक वारसा जपण्यासाठी व त्यांचे विचार आजच्या विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित लेख, भाषण, व्याख्यान , कविता , तसेच इतर कार्यक्रम आयोजित करून त्यांचा वैचारिक वारसा जपण्याचे कार्य करावे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सातारा शहरातील राजवाडा चौक येथील सरकारी शाळा आजची प्रतापसिंग हायस्कूल येथे आजच्या दिवशी म्हणजे ७ नोव्हेंबर रोजी प्रवेश घेतला होता ( ७ नोव्हेंबर १९०० ) आणि आजच्याच दिवसापासून बाबासाहेबांच्या शैक्षणिक प्रवासाला खरी सुरुवात झाली होती. तेव्हा बाबासाहेबांचे शाळेतील नाव भिवा रामजी आंबेडकर असे रजिस्टर मध्ये लिहिलेले आहे . हा ऐतिहासिक वारसा तेथील शाळेने जपून ठेवला खर तर त्यांचे आभार.
बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दीन आजचा विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो सर्वच भारतीयांना व आजचे वैचारिक आंबेडकर ज्यांनी बाबासाहेबांचे स्वप्न जिवंत ठेवण्याचे कार्य हाती घेतलेले आहे त्या सर्वांना मानाचा जय भीम व विद्यार्थी दिवसाच्या शुभेच्या 💐💐💐