पुन्हा पुन्हा ही सजा
पुन्हा पुन्हा ही सजा
झाली जीवनाची ही दशा
सांभाळले का नाही मी मला
सावरले का नाही तू मला
पुन्हा पुन्हा ....
आजचे हे सत्य कोणते
आजच हा भ्रम का दिसे
वाऱ्यागत जिने हे माझे
उध्वस्त जीवन हे कोणाचे
पुन्हा पुन्हा ......
सुने - सुने जिने हे
सुन्या - सुन्या त्या आठवणी
आयुष्याच्या या वळणावरति
सोबती ना माझे कोणीही
पुन्हा पुन्हा .......
आठलें हे अश्रू प्रेमाचे
आठल्या या जीवनातील कथा
कोणीच का नाही माझे
अंधार हे जीवन हे
पुन्हा पुन्हा ........
पवन नागोराव प्रभे