सहदेव भांडळी ( भाग दोन ) लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सहदेव भांडळी ( भाग दोन ) लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, २९ जानेवारी, २०२३

सहदेव भांडळी ( भाग दोन )

सहदेव भांडळी ( भाग दोन ) :-

सहदेव भांडळी ( भाग एक वरून... )
     एके रात्री सहदेव झोपिमध्ये असताना त्याच्या स्वप्नांमध्ये एक दिव्य व्यक्ती येऊन त्याला त्रिलोल ज्ञान कसे प्राप्त करता येईल या विषयी  संबोधन करतांना सांगितले की या - या ठिकाणी जाऊन तेथे एका दिव्य व्यक्तीची व त्रिकाल ज्ञान प्राप्त व्यक्तीची समाधी आहे ती समाधी उकरून मिळालेल्या शरीराची कवठी काढून ती कवठी रोज एका दगडावर घासून त्याचे चूर्ण करावे व पाणी मध्ये मिसळून रोज प्यावे असे रोज केल्याने तुला त्रिकाल ज्ञान प्राप्त होऊन तू विद्वान ज्योतिषी होशील . परंतु या मध्ये एक अट आहे ती अट म्हणजे हे रहस्य कोणालाही न सांगता तुला करावे लागणार व कवठी उगाळून त्याचे पाणी पिताना कोणालाही दिसणार नाहीस .

( त्रिकाल ज्ञान म्हणजे --> भूतकाळ, वर्तमान काळ, आणि भविष्यकाळ या तीनही काळाचे ज्ञान म्हणजे त्रिकाल ज्ञान होय. उदा . एखाद्या व्यक्तीचा इतिहास काय होता , वर्तमानात काय आहे , व तो व्यक्ती भविष्यात काय असणार या सर्वांचे ज्ञान म्हणजे त्रिकाल ज्ञान होय. )

सहदेवाला तेव्हाच जाग येऊन स्वप्नमधील दिव्य व्यक्तीने सांगितलेल्या ठिकाणी सहदेव जाऊन तेथील समाधी उकरतो व कवठीला उगाळून पाण्यामध्ये मिसळून तो पितो. सहदेव रोज मध्य रात्रीला जाऊन कवठी उगाळून पित होता . त्यामुळे त्याला त्रिकाल ज्ञान प्राप्ती होत होती . त्याच्या ज्ञानाची कीर्ती सर्वदूर पसरत होती . सहदेवाची सर्वत्र ज्ञानाची चर्चा ऐकून भांडळी अस्वस्थ होत होती. 

     एके दिवशी भांडळी सहदेवावर लक्ष ठेविते व मध्य रात्रीला सहदेव कुठ जातो म्हणून त्याचा पाठलाग करीते , सहदेव समाधी उकरून व त्यातील कवठी उगाळून पाण्यामधून पित असताना भांडळी ही एका झुडपामागुन पाहते. सहदेवाचे तेथील काम झाल्यावर सहदेव कवठी समाधीच्या ठिकाणी पुरून तिथून निघून जातो . परंतु सहदेवाचा पाठलाग करणारी भांडळी ही समाधी उकरून व त्यामधील  कवठी बाहेर काढून ती पूर्ण कवठी दगडावर ठेचते व कवाठीचा बारीक भुगा बनवून पाण्यामध्ये मिसळून ती पिते  भांडळी एकाच वेळी संपूर्ण कवाठीचे चूर्ण करून पाण्यासोबत पिल्याने त्रिकाल ज्ञान प्राप्त होते . दुसऱ्या दिवशी सहदेव त्या समाधी जवळ जाऊन कवठी शोधतो पण त्याला ती कवठी सापडत नाही , जेव्हा निराश होऊन तो परत घरी येतो तेव्हा घडलेला सर्व प्रकार सहदेवाच्या ध्यानात येतो . पण भांडळी ही आपली लहान बहीणच आहे म्हणून कोणताही अहंपणा न ठेवता सहदेव आपल्या लहान बहीण भांडळी सोबत राहून त्रिलोक विद्या तसेच ज्योतिष शास्त्र चे ज्ञान इतर ज्ञान प्राप्त करतो.

     भांडळी ही परंपरा वाद नाकारणारी तसेच पुरुषी वर्चस्व झुगारणारी होती  हे तिच्या जीवन चरित्रावरून तसेच कथेवरून समजते . व्यासांनी लिहिलेल्या मेघमाला या संस्कृत ग्रंथाचे मराठी प्राकृत भाषेमध्ये भाषांतर भांडळीने केले . तसेच कृषीपरंपरे विषयी , विवाह विषयी आरोग्य विषयी तसेच हवामान , पर्ज्याण्यमान इत्यादी शास्त्रांच्या आधारे केलेले विवेचन तिने मांडलेले आहे .

भारताचे संविधान कोणी लिहिले? प्रेम बिहारी नारायण रायजादा/ संविधान सभा/ मसुदा समिती

आपल्या सर्वांना माहीतच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अथक प्रयत्न करून भारतामध्ये जगातील सर्वात मोठी लोकशाही रुजवण्यात यशस्वी झालेत. जर...