सोमवार, ७ फेब्रुवारी, २०२२

शिक्षण काय आहे , मराठी शैक्षणिक कविता

#शिक्षण
शिक्षण काय आहे

शिक्षण काय आहे
श्राद्ध आणि अंधश्रद्धा 
यांच्या मधोमध विश्वासाची 
रेखाटलेली एक रेख आहे

ज्याला या रेषेतील सामर्थ्य कळले
तोच या ठिकाणी प्रतेक संकल्पनेला विजयी आहे

फेकुनी दे आता ते शस्त्र
फेकूनी दे आता ते धार्मिक झेंडे
आता स्वीकार कर महापुरुषांचा 
त्यांच्या विचारांचा त्यांच्या लेखणीचा 

शिक्षणाचे सामर्थ्य समजून घे
तुझे हक्क तुझे अधिकार जाणून घे
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे 
ते पिऊन एकवेळ डरकाळी फोडून घे 

बंद कर आता तुझ्या शिक्षणाला काळ फासने 
कुत्र्याच्या शेपटी सारखं मागे मागे राहणं

वेळ आलेली आहे
तुझे अस्तित्व दाखवायची 
श्रद्धा आणि अंधश्रद्धा 
यांच्या मधोमध ची रेषा ओळखण्याची .

     नामवंत प्रभे ७ फेब २०२२

भारताचे संविधान कोणी लिहिले? प्रेम बिहारी नारायण रायजादा/ संविधान सभा/ मसुदा समिती

आपल्या सर्वांना माहीतच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अथक प्रयत्न करून भारतामध्ये जगातील सर्वात मोठी लोकशाही रुजवण्यात यशस्वी झालेत. जर...