आताच दनविर होतो ,
आताच याचक झालो
कळलो नाही कधीच कोणाला,
जेव्हा प्रश्न झालो
या चुपचाप रात्रीची शांतता ,
जेव्हा आवाज देत होती
झाले होते कित्तेक गुन्हे,
जेव्हा बेईमान मी झालो
रोजच मराया लागतो ,
श्वास तो उधार जींदगाणीचा
मुर्दे पडून सडत होते ,
जेव्हा शांत मी झालो
या जातीत तुझ्या आणि माझ्या
असे काय खास आहे
तेव्हा तू लाचार धर्मवेडा
तर मी विद्रोही गुन्हेगार आहे
हे भयाण धर्माचे संकट
का छळतोस आम्हाला
जरी जात लुळी पांगळी माझी
या जातिव्यवस्थेच्या कतील मी झालो
विद्रोह होत होता चारही दिशांनी ,
रक्तपात होत होता माणसांचा माणसांनी
लेखणीच्या हातांनमध्ये जेव्हा तलवारी दिसल्या ,
बंड करायचा राहुनी गेला थंड मी झालो
कळले नाही कधीच कोणाला
नामवंत पवन ...
व्हिडिओ पाहण्यासाठी समोरील लिंक व क्लिक करा :- लिंक क्लिक