सोमवार, ७ नोव्हेंबर, २०२२

विद्यार्थी दिवस महाराष्ट्र

बोधिसत्व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळा प्रवेश दिवस हा महाराष्ट्रातील विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.

     महाराष्ट्रातील शिक्षण विभागाने १७ ऑक्टोंबर २०१७ रोजी घेतलेल्या निर्णय मध्ये असे सांगण्यात आलेले आहे की , डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळा प्रवेश दीन निमित्त शाळा कॉलेज तसेच इतर ठिकाणी बाबासाहेब यांचा वैचारिक वारसा जपण्यासाठी व त्यांचे विचार आजच्या विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित लेख, भाषण, व्याख्यान , कविता , तसेच इतर कार्यक्रम आयोजित करून त्यांचा वैचारिक वारसा जपण्याचे कार्य करावे. 

     डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सातारा शहरातील राजवाडा चौक येथील सरकारी शाळा आजची प्रतापसिंग हायस्कूल येथे आजच्या दिवशी म्हणजे ७ नोव्हेंबर  रोजी प्रवेश घेतला होता ( ७ नोव्हेंबर १९०० ) आणि आजच्याच दिवसापासून बाबासाहेबांच्या शैक्षणिक प्रवासाला खरी सुरुवात झाली होती. तेव्हा बाबासाहेबांचे शाळेतील नाव भिवा रामजी आंबेडकर असे रजिस्टर मध्ये लिहिलेले आहे . हा ऐतिहासिक वारसा तेथील शाळेने जपून ठेवला खर तर त्यांचे आभार. 

बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दीन आजचा विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो सर्वच भारतीयांना व आजचे वैचारिक आंबेडकर ज्यांनी बाबासाहेबांचे स्वप्न जिवंत ठेवण्याचे कार्य हाती घेतलेले आहे त्या सर्वांना मानाचा जय भीम व विद्यार्थी दिवसाच्या शुभेच्या 💐💐💐

शुक्रवार, ४ नोव्हेंबर, २०२२

तिचे अधूरे स्वप्न , मराठी संवेदनशील कविता by नामवंत पवन...

तिचे आधुरे स्वप्न
तिचे अधूरे स्वप्न

शरीराचा बाजार मांडला की काय
सौंदर्यच संपुष्टात आले
आलीच गरीबाची मुलगी वयात 
तिच्या बापाच्या हृदयाचे ठोके
संपुष्टात आले...

कोण्या श्रीमंतांची नजर 
पडलीच तिच्यावर तर
तिचे दिवस भरून आले...
केलीच तिने त्याच्याशी 
लग्न करण्याची विनवणी
भर कोर्टात ती वैश्यां असल्याचे
सबुत धाऊन आले...

कोण्या काळी बापाच्या नजरेत 
देवी असलेली मुलगी समाजाच्या गल्लीतून 
जेव्हा हिनवल्या जाते...
सांगा त्या बापाचे काळीज 
कुठ दम तोडते...

सांगा त्या बापाचे काळीज
कुठ दम तोडते...

हसता खेळता परिवार
जेव्हा तुटून जातो
सांगा त्या लेकीची इज्जत
कुठ हरवुन जाते..
स्मशानाच्या चितेवर की
श्रीमंतांच्या खाटेवर..
की अशीच समाजाच्या नजरेत
नीच प्रवृत्तीची जात
होऊन जाते...

की अशीच समाजाच्या नजरेत
नीच प्रवृत्तीची जात होऊन जाते...

तिचा बाप आता 
फारसा काही बोलत नाही
दारू सोडून दुसरे काहीच 
तो पित नाही...

लग्नाचं वय निघून गेलेली मुलगी
शरीराची जेव्हा भूक भागविते
दिवसाप्रमाणे माणसे बदलून जातील
मात्र नवऱ्याचे स्वप्न हे 
तिच्या नजरेत अधुरेच राहते..

मात्र नवऱ्याचे स्वप्न 
तिच्या नजरेत अधुरेच राहते....

     नामवंत पवन... ( अमरावती )
     ८०१०८४४८४३
फोटो :- google

भारताचे संविधान कोणी लिहिले? प्रेम बिहारी नारायण रायजादा/ संविधान सभा/ मसुदा समिती

आपल्या सर्वांना माहीतच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अथक प्रयत्न करून भारतामध्ये जगातील सर्वात मोठी लोकशाही रुजवण्यात यशस्वी झालेत. जर...