थकला कधी न भीमा
https://youtu.be/M4HzpnwviGo
थांबला कधी न भीमा
थकला कधी न भीमा
जे रोज रोज छळती
उरला पुरून भीमा
जी रोजचीच संकटे
नजरे समोरूनी जाती
त्या संकटावर उभी
ही कायनात केली
जे पाणी आज पितो
त्यासाठी संघर्ष खूप केला
त्या काळारामाच्या प्रवेशासाठी
लढला तो खूप भीमा
पुणे करार झाला , ती
रात्र अवघड होती
त्या बहुजनांसाठी
दुःखात रात्र होती
आजही विरोधकांच्या
हृदयात धड धड होते
भीमा तुझ्या पुतळ्यांची
विटंबना फार होते
कळले ना मला आजवर
ही जाती काय आहे
उभ्या आयुष्यात माणसांच्या
माणूसच शाप आहे
✍️पवन नागोराव प्रभे