निळावंती भाग ४
निळावंतीचा परोपकारी स्वभाव :-
त्या व्यापारी ने व निळावंतीने सोबत राहण्याचा निर्णय केलेला आहे , निळावंती आता राहण्यासाठी त्या व्यापाऱ्यांच्या गावाला म्हणजे व्यापाऱ्यांच्या घरी जायला निघाली , सुरुवाती पासूनच ती इतरांना मदत करीत असे मग ती पाहत नसे की मदत मागणार कोण आहे .
असेच रस्त्याने जात असताना निळावंती ला कशाचा तरी आवाज येतो , ती पहाते तर काय एक मुंगासाची जोडी तिला मदती साठी याचना करीत आहे , निळावंती आपल्या स्वभावानुसार त्या मुंगसाची मदत करायचे ठरविते . त्या मुंगसाच्या जोडीमधील नर मुंगूस हा आंधळा असतो . मादा मुंगूस निळावंतीला विनंती करते की नर मुंगसाचे डोळे तुझ्या मिळविलेल्या विद्येने पूर्ववत कर, निळावंतीला त्या मुंगसाची खूप दया येते व तिच्या स्वभावानुसार ती त्या मुंगसाची मदत करते, तिला सर्वच माहिती राहते की कुठल्या आजारावर कुठली औषध कुठला मंत्र प्रभावी ठरणार . निळावंती तिच्या जवळ असलेले लाल फडके मादी मुंगूस ला देते व नर मुंगूसाच्या डोळ्यांवर बांधायला सांगते . पहाते काय तर आचर्य त्या नर मुंगुसाचे डोळे परत आलेत व त्या मुंगुसला पूर्ववत पुन्हा चांगले दिसू लागले . माणूस सोडून कोणत्या पण प्राण्यावर केलेले उपकार हे कधीही विसरणार नाहीत (अनेक लोक बोलतात त्या प्रमाणे ) निळावंती आपल्या प्रवासात मुंगुसाला सुद्धा सोबत घेते.
आणखी सोबत चालत असताना एक वृद्ध व्यक्ती निळावंती ला येऊन भेटतो . रस्ता हा जंगला शेजारून असल्याने अनेक प्राण्यांचा सामना त्यांना करावा लागतं होता. हा वृद्ध व्यक्ती निळावंती ला थोड्या दूर अंतरावर असलेल्या नागराजाची कहाणी सांगतो व नागराजाजवळ असलेल्या नागमनी विषयी सांगतो , निळावंती हे ऐकताच आपल्या सोबत असलेले मुंगासंच्या जोडीला सोबत घेऊन नाग व नागमनी च्या शोधात चालायला सुरुवात करते , त्या वृद्ध व्यक्तीने सांगितलेल्या ठीकणी जायचे ठरविते , तो वेळ दिवस मावळण्याचा असतो . म्हणून जंगलात सर्व ठिकाणी अंधार पसरलेला असतो, थोड्या दूर अंतरावर निळावंतीला उजेड दिसतो , ते सर्वजण त्या उजेडाच्या दिशेने चालायला सुरुवात करतात तर पाहतात की साप आपला नागमंनी बाहेर काढून त्या नागमनीच्या च्या प्रकाशात फिरत आहे . निळावंती आपल्याकडे असलेल्या मुंगसाच्या साहाय्याने ती नागमनी मिळविते, व आपला प्रवास सुरू ठेवते.