भारतीय मूळ संविधानाच्या प्रत वर देवी देवतांचे फोटो याचा अर्थ संविधान निर्माते हिंदुराष्ट्र या संकल्पनेला प्रोत्साहन देणार होते का?
या चित्रामध्ये कृष्ण अर्जुनाला मार्गदर्शन करीत आहे व्हिडिओ लिंक
खरं म्हणजे भारतीय संविधानात लिहिलेले शब्द आणि भारतीय संविधानात रेखाटल्या गेलेले चित्र यांचा परस्पर कोणताही संबंध येत नाही. भारतीय संविधानात रेखाटलेले चित्रहे फक्त भारताचा प्राचीन इतिहास मध्ययुगीन इतिहास आणि आधुनिक इतिहास या सर्व विषयांना दर्शवतो , या चित्रावरून संविधान सभेत फार मोठा गोंधळ सुद्धा झालेला होता.
पंत निरपेक्ष किंवा धर्म निरपेक्ष असलेल्या राष्ट्रातील संविधानात राम कृष्ण यांचे चित्र का ?
---> मान्यतेनुसार भारतात चार युग आहेत
१) सतायुग
२) त्रेतायुगा
३) द्वापरयुग आणि
४) कलियुग
हा मानवाच्या उत्क्रांतीचा इतिहास सांगतो.असा समज आहे. या रेखाटलेल्या चित्रामध्ये सम्राट अशोकाच्या काळातील अशोक चक्र, त्रिमुखी सिंह , घोडा, वाघ, हत्ती, बैल, ई हे चित्र मोहेंजोदडो येथील चित्रासारखे रेखाटलेले आहेत. त्रेतायुग मधील राम लक्षण रावण सीता हनुमान यांचे चित्र दाखविण्यात आले आहेत. कृष्ण हा अर्जुनाला गीता सांगत आहे ते चित्र दाखविण्यात आले. त्यानंतर भगवान बुध्द व त्यांच्या पाच शिष्यांना दाखविले आहे. भगवान महावीर यांची समाधी घेतलेली मुद्रा , गुप्त काळ त्यानंतर मध्ययुगीन इतिहासातील चित्रे रेखाटण्यात आले आहेत जसे की , उदिसा मधील मूर्तिकला , नटराज मूर्ती , महाबलीपुरम मंदिर, त्यानंतर मुघलांचे राज्य अकबर बादशहा , त्यानंतर गुरु गोविंद सिंह, शिवाजी महाराज नंतर ब्रिटिश काळ सुरू होतो. त्यामध्ये टिपू सुलतान आणि महाराणी लक्ष्मीबाई यांचे सुद्धा चित्रे दाखविण्यात आली आहेत. आधुनिक भारतातील चित्रांमध्ये गांधींची दांडीयात्रा, आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे चित्र दाखविण्यात आले, त्यानंतर भारतातील सर्वोच्च पहाड हिमालय पर्वत असे अनेक चित्र दाखविण्यात आले.
प्रसिद्ध चित्रकार नंदलाल बोस आणि भारतातील प्रथम पंतप्रधान यांची भेट शांतिनिकेतन येथे झाली. तेव्हा पंडित नेहरूंनी नंदलाल बोस यांना एक संधी देण्याची तयारी दर्शविली की, भारतीय संविधानात मूळ प्रती मध्ये चित्रकाढून संविधान च्या सौंदर्यात आणखीन भर पाडावी. संपूर्ण संविधानाच्या पानावर चित्र रेखाटने शक्य नव्हते म्हणून नंदलाल बोस यांनी संविधानात असलेले बावीस भागावर आपल्या कलेची छाप उमटवीली.
काही नेत्यांची भाषणे म्हणायची किंवा social media वर viral होत असलेली post, comment म्हणायची किंवा आपल्या एखाद्या मित्रासोबत चर्चा होत असताना त्याने असा प्रश्न विचारायचा की आपल्याजवळ त्याचे समाधान कारक उत्तर नसले तर तो प्रश्न म्हणजे ,.. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान हे संपूर्ण इतर देशांची नक्कल copy आहे . खरं म्हणजे तेव्हा आपल्याजवळ महत्त्वाची माहिती उपलब्ध नसल्याने आपल्याला शांत किंवा चूप राहण्यापलीकडे दुसरा उपाय नसतो.
भारतीय संविधान इतर देशांची नक्कल आहे किंवा नाही या महत्वाच्या प्रश्नांची आपण उकल करणार आहोत.
कोणत्याही एका गोष्टीची निर्मिती करायची असल्यास त्या गोष्टीची आपणास पूर्णतः माहिती असणे गरजेचे आहे, जर त्या गोष्टीची पूर्वकल्पना न करता किंवा त्या गोष्टीची संपूर्ण माहिती न मिळविता ती गोष्ट निर्माण करणे म्हणजेच वेळ पैसा आणि त्या गोष्टीची निर्माण करतेवेळी लागलेली मेहनत संपूर्ण वाया गमावल्यासारखे होईल.
एकाद्या व्यक्तीला घर बांधायचे असल्यास घराचा मालक अनुभवी व्यक्तीलाच घर बांधायला देईल किंवा सुंदर इमारत बांधावयाची असल्यास अनुभवी इंजिनियर यांनाच प्रस्ताव पाठविला जाईल ते त्यांच्या अभ्यासा अनुसार किंवा अनुभवा अनुसार आपण किती घरांची निर्मिती अथवा इमारतींची निर्मिती केली या सर्व गोष्टींचा विचार करूनच पुढील घर किंवा इमारत बांधल्या जाईल
संविधान निर्मितीच्या वेळेस आपणास वरील गोष्टीचा विचार करणे फार गरजेचे आहे. म्हणूनच संविधान सभेने अश्या व्यक्तीच्या हाती संविधान निर्मितीचे कार्य सोपविली जे भारतातील सर्वात प्रतिभाशाली व सर्वाधिक उच्च विद्याविभूषित व्यक्ती होते, ते म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर
डॉ बाबासाहेब आंबेडकर हे बहुमुखी प्रतिभाशाली होते ते तळागळातून उभारलेले नेतृत्व होते, अनेक भाषांचे ज्ञान तसेच त्यांची निर्भिळ पत्रकारिता पण होती, त्यांनी अनेक जबाबदाऱ्या पण पार पाडल्या होत्या. म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर मसुदा समितीची जबाबदारी सोपविण्यात आली.
आता आपला प्रश्न पाहू की , भारतीय संविधान इतर देशांची पूर्णतः नक्कल आहे का ?
आपण वरील उदाहरणांवरून पाहिलेच आहे की, चांगले घर किंवा चांगली इमारत बांधतांना अनुभवी व्यंतीची गरज असते त्याच प्रमाणे भारताचे संविधान लिहिण्यासाठी इतर देशांतील संविधानाचा अभ्यास करणे पण तेवढेच महत्त्वाचे आहे . एक चांगले संविधान निर्मितीसाठी बाबासाहेबांनी जवळपास साठ (६०) पेक्षा अधिक देशांतील संविधानाचा अभ्यास केलेला होता. त्यामधील जे महत्त्वाचे घटक आहेत ज्या घटकांमुळे भारताचे भवितव्य उज्वळ बनू शकते असे काही महत्त्वाचे घटक भारतीय राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आले. सर्वात महत्त्वाची बाब ही की बाबासाहेबांनी ज्या देशांकडून जे महत्त्वाचे घटक घेतले त्या देशांना त्यांचे संविधानात नाव लिहून त्यांना त्यांचे श्रेय दिले जर बाबासाहेबांनी शब्दांची हेर फेर करून त्या देशांना त्यांचे श्रेय दिले नसते तर कोणाला काय माहिती होणार होते , परंतु येथे बाबासाहेबांचा प्रामाणिक पणा येतो व ज्या ज्या देशांकडून जे जे घेतले त्यांचे नावे पण लिहिली . म्हणून या ठिकाणी भारतीय संविधान हे इतर देशांची किंवा १९३५ च्या कायद्याची पूर्णतः copy किंवा नक्कल आहे असे म्हणणे योग्य होणार नाही.
वरील प्रमाणे भारतीय संविधान कोणी लिहिले या महत्त्वाच्या प्रश्नांचे उपप्रश्र्न तयार करून आपण त्या प्रश्नाची उकल करून महत्त्वाची माहिती पाहिली जर या विषयी काही महत्त्वाची प्रश्न असतील तर नक्कीच comment मध्ये विचारा व नवीन माहिती पर व्हिडिओ कोणत्या विषयांवर हवा ते सुद्धा कमेंट मध्ये सांगा ....
असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच नवनवीन माहितीसाठी चॅनल सबस्क्राइब करा व व्हिडिओ लाईक करून प्रतिक्रिया जरूर नोंदवा. पूर्ण व्हिडिओ लिंक क्लिक
नामवंत पवन
जयभीम जय संविधान🙏
#IndianConstitution #babaaahebambedkar #संविधान #आंबेडकर #भारत #news #namvantpavan