रात्रीची संध्याकाळ
अशीच सायंकाळ झालेली होती माझी आणि घरच्यांशी थोडी बोलचाल झाली माझा स्वभाव थोडा रागीट असल्याने आई वडिलांना रागाने बोलून मोकळा झालो कोणाशीच काहीही न बोलता घरातून मोटार सायकल घेतली आणि मोकळा स्वास घेण्यासाठी घराबाहेर निघालो जवळपास त्या वेळेला सायंकाळ चे ७:३० वाजले असतील , मोटार सायकल चौकामध्ये थांबविली व पान टपरीवर एक सिगार चे पाकीट व माचिस पेटी घेतली .
सिगार व माचिस पेटी घेऊन मोकळा स्वास घेण्यासाठी गावाच्या बाहेर निघालो . आता जवळपास सायंकाळ चे ८:०० वाजत आले होते त्या वेळी पावसाळा सुरू असल्याने पावसाचे बारीक बारीक थेंब सुरू होते. मी गावापासून थोडे दूर म्हणजेच मोटार सायकल ने गावाची वेशी ओलांडली होती, पाऊस आता थोडा वाढत चालला होता . मोटार सायकल आता एका झाडाच्या आडोशाला उभी करून इकडे तिकडे पाहत होतो . नंतर मोटार सायकल ला टेकत खिषांना तपासले , खिशातले सिगार चे पाकीट काढून एक सिगार ओठांखाली दाबली व माचिस पेटीची एक काळी पेटवून सिगार पेटविली , व एक एक कश ओढत असे स्वतःलाच जाहीर केले की मी आता मोकळ्या हवेत स्वास घेत आहे.
सिगार च्या धूर बरोबरच घड्याळ चे काटे सुधा फिरत होते व पाऊस सुधा वाढत होता , आता रात्रीचे जवळ पास दहा वाजून गेले रस्त्याच्या दूरवर कोणीही दिसत नव्हते पावसाळा असल्या कारणाने सायंकाळी सातलाच वाहतूक बंद व्हायची मी एकटाच त्या रात्री मोटार सायकल सह सिगार ओढत होतो आता माझा राग सुद्धा कमी झाला होता व पाऊस पण कमी झालेला होता , तरी पण एकट्याला मला तिथेच थांबावेसे वाटत होते, आता एक नजर मी रस्त्याच्या दूरवर मारली तर पाहतो काय तर एक मुलगी पांढऱ्या शुभ्र कपड्यांमध्ये माझ्याकडे चालत येत होती . मी माझ्या डोळ्यांनी तिला एकटक पाहत होतो , तिच्या अंगावरील कपडे पांढरे शुभ्र व एका हाती पावसापासून संरक्षण व्हावे त्यासाठी छत्री , मनामधे विचार आला की येवढ्या रात्रीला कोणी मुलगी कशी काय एकटीच फिरत असणार मला सुरवात ला तिच्यावर संशय आला नंतर विचार केला की पावसाळा असल्या कारणाने गाडी मिळाली नसणार म्हणून पायी चालत आली असणार , आता ती मुलगी माझ्या अगदी जवळ आली तर थोडी ओळखीची वाटत होती, हा आठवत आहे की ही मुलगी तीच आहे जी गावाशेजारी राहते पण कधी या मुलीशी बोलणे झाले नाही , हो आम्ही एकमेकांना पहायचो , मला वाटते की आम्ही एकमेकांना आवडत सुद्धा होतो, पण आम्ही कधीही एक मेकंसोबत बोललो नाही किंवा या विषयावर चर्चा सुद्धा केलेली नाही, असो पण येवढ्या रात्री ही मुलगी काय करीत आहे कशासाठी ही मुलगी येवढ्या रात्री आली असणार हे समजत नव्हते, डोक्यामध्ये एक नाही तर अनेक प्रश्न उपस्थित होत होते.
ती माझ्या कडे एकटक पाहत होती मला पडणारे प्रश्न मी सर्वच विसरत होतो आणि मी पण तिच्याकडे पाहू लागलो . पाऊस तो पर्यंत पूर्ण थांबला होता , रात्रीची गार हवा सुरू होती तरीपण हवेमध्ये पाऊस जाणवत होता ती पक्त माझ्याकडे पाहत होती आणि मी तिच्याकडे बोलण्यासाठी तर भरपूर काही होते पण आमच्या दोघांकडे सुद्धा शब्द नव्हते . ती माझ्याकडे अशी पाहायची की मी तिला आता सोडून जात आहे आणि पुन्हा आमच्या दोघांची भेट कधीही होणार नाही . तेवढ्यातच एक वीज कडाडली आणि माझे लक्ष थोडे विचलित झाले , परंतु ती मला एकटक पाहत होती . रात्रीची बरीच वेळ झाली होती जवळपास अकरा वाजून गेले , शेवटी मीच तिला म्हणालो , " खूप वेळ झाली आहे, आहे ना" परंतु ती तरी सुद्धा माझ्याकडेच पाहत होती आणि मुंडके हलवून तिने होकार दर्शविला , मी मोटार सायकल गावच्या दिशेने करीत त्यावर बसलो व तिला पण बसण्याचा इशारा केला , मी - " तुला तुझ्या गावाकडे सोडून देऊ का " ती म्हणाली -" नको मला तुमच्या सोबत तुमच्याच घरी यायचं आहे ( ती थोडी घाबरत म्हणाली )
मी विचार करीत होतो की एवढ्या रात्री एका मुलीला घरी घेऊन गेलो तर घरचे काय म्हणतील गाववाले काय म्हणतील , परंतु मी मनापासून फार आनंदी होत होतो , की ती मुलगी तिला सोडून जीला सोडून मी कधी कोणाला पाहिले नाही ती माझ्या सोबत माझ्या घरी येत आहे व माझ्या सोबत राहायला पण तयार आहे मी खुप मनातुन आनंदी झालो, मी पटकन मोटार सायकल सुरू करून गावाच्या दिशेने निघालो व थोड्याच वेळात घरी पोहोचलो , माझे घरचे माझी काळजी करीत पूर्ण गावभर मला शोधत होते . मी तिला घेऊन घरी येताच सर्वच मला पाहू लागले , घरचे आई बाबांना तिच्या विषयी सांगितले , पण कोणी काहीच बोलले नाही , मला आणखी वाटले की घरचे अजून पण माझ्यावर नाराज आहेत . मी तिला जेवण्यासाठी विचारले तिने मानेने नाही म्हणीत माझ्याकडे पाहत होती, वा घरचे पण माझ्याकडे पाहत होते जसे की ते मला पहिल्यांदा पाहत आहेत, मला पण झोप भरपूर येत होती , मी तिला झोपण्यासाठी बेड करून दिले व झोपण्यासाठी सांगितले तिने मानेनेच होकार दिला, घरचे मला दुरूनच पाहत होते ,मला घरच्याचा स्वभाव थोडा वेगळा वाटत होता, हो शायद त्यांना या मुलिविषय वाटत असेल की येवढ्या रात्री मी कोणाला घेऊनी आलो आहे, पण मी कोणाशीच बोलण्याच्या मूळ मध्ये नसल्याने मी फक्त झोपायचे ठरविले ,तिने माझ्याकडे पाहत थोडी हसत होती व थोडी रडत होती मला काहीच कळत नव्हते , नंतर डोक्यामध्ये असाच विचार आला की आपण एका मुलीला आपल्या घरी घेऊन आलो तिचा स्वभाव कसा असणार तिचे बॉयफ्रेंड असणार की काय, डोक्यामध्ये विचार घुमत होता, पण नंतर म्हटले की जे झाले असणार ते तिचा भूतकाळ पण आज पासून आम्ही दोघे सोबत राहू, व मी मनात ठरविले की तिला तिच्या भूतकाळाविषयी काहीच विचारणार नाही, व मी तिला पाहत झोपी गेलो .
मी दुसऱ्या दिवशी झोपेतून थोडा उशिरा उठलो , घरचे मला वेगळ्याच नजरेने पाहत होते , मी काहीच समजत नव्हतो , मी घरी विचारले तूम्हीं तीला पाहिले काय , घरचे एकमेकांकडें पाहत होते . मग मीच तिला शोधायला सुरुवात केली , घराच्या बाहेर येऊन पाहिले , घराशेजारील पारावर काही लोक बसलेले होते , त्यांच्या जवळ तिथे गेलो व त्यांना विचारतो म्हटले पण मला जे माहीत झाले माझ्या पायाखालून जमीन सरकली , मला माहिती झाले की गावशेजारील गावात काल रात्री ९, १० च्या दरम्यान एक तर्फा प्रेम प्रकरणातून ४ युवकांनी एका मुलीची हत्या करून गावाबाहेरील रोड वर फेकले .
✍️पवन नागोराव प्रभे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा