शुक्रवार, १८ जून, २०२१

चारू मुजुमदार charu mujumdar ( मराठी माहिती )

चारू मुजुमदार :- 
     यांचा जन्म १९१८ मध्ये पचिम बंगाल मधील सिलिगुडी या शहरामध्ये झाला. ते आपल्या जीवनातील अनेक प्रकारच्या संकटांना निधळ्या छातीने समोर गेले ते आपल्या प्रारंभिक जीवनामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे नेते होते व सोबतच लोकांना जोडण्याचे काम पण त्यांनी केले अनेक कामगारांना त्यांनी जोडले. काही कारणास्तव त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ला सोडून कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया या पक्षाबरोबर काम करण्याचे ठरविले . तेथील शेतकरी आंदोलन असो की कोणत्याही कामगाराचे आंदोलन असो चारू मुजुमदार हे त्या आंदोलनामध्ये आवर्जून भाग घ्यायचे , त्यांना अशा कारणामुळे कारावासाची शिक्षा सुद्धा भोगावी लागली .

     कामगारांमध्ये त्यांना मिळत असलेली प्रसिध्दी या कारणामुळे त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही . त्यांनी सुरू केलेले आंदोलनाला प्रसिध्दी मिळत होती व आंदोलन सफल होत होते अशा अनेक कारणामुळे ते प्रेरित होऊन, व लोकांचा त्यांच्यावर असलेला प्रभाव पाहून आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी त्यांनी सरकारविरुद्ध सशस्त्र आंदोलनाला सुरुवात केली.
 
     चारू मुजुमदार यांनी समविचारी असणाऱ्या लोकांना जमऊन एक सशस्त्र सेना तयार केली .१९६७ मध्ये पच्छिम बंगाल मधील नक्षलवाडि‌ या गावामधून चारू मुजुमदार यांनी कानु सन्याल याला सोबतीला धरून सशस्त्र क्रांतीला सुरुवात केली . याच सशस्त्र क्रांतीला नक्षलवाद असे नाव पडले .

      पोलिसांना आपल्या ठिकाणचा पत्ता नाही लागायला पाहिजे म्हणून त्यांची अनेक गुपित ठिकाणे होती परंतु जुलै १९७२ ला चारू मुजुमदार यांना आपल्या गुप्त ठिकाणी पकडण्यात आले . काहीच दिवसात म्हणजे २८ जुलै १९७२ मध्ये पोलिसांच्या कारवाई मुळे त्यांचा कारावास मध्येच मृत्यू झाला.

     चारू मुजुमदार यांच्या मृत्यूनंतर त्यांचे आंदोलन एका मधून अनेक विभागात विभागले गेले . आणि त्या आंदोलनाचे दुष्परिणाम अनेक राज्यातील नक्षली भागातील नागरिकांना भोगावे लागत आहे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

भारताचे संविधान कोणी लिहिले? प्रेम बिहारी नारायण रायजादा/ संविधान सभा/ मसुदा समिती

आपल्या सर्वांना माहीतच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अथक प्रयत्न करून भारतामध्ये जगातील सर्वात मोठी लोकशाही रुजवण्यात यशस्वी झालेत. जर...