मंगळवार, २६ ऑक्टोबर, २०२१

एक नवीन ध्यास ( अलक / मराठी कथा )

एक नवीन ध्यास (मराठी कथा)
एक नवीन ध्यास (अलक / मराठी कथा )
     सतत च्या अपयशाने मी खचून जाऊन कुठ तरी लांब प्रवासाला जाण्याचे ठरविले , बस ने प्रवास करतांना दहा किलोमिटर अंतरावर एक बस स्थानक लागले व काही वेळ तिथे बस थांबली , आणि सहज म्हणून मी खिडकीच्या बाहेर डोकावले तर डोंबर्यांचा खेळ सुरू होता व खेळ खेळत असताना लहान लहान मूल एक एक रुपया जमावाकडून गोळा करीत होती. प्रवासी बस मध्ये बसले बस पुन्हा सुरु झाली माझ्या डोक्यात डोंबाऱ्याचा खेळ व पैसे जमा करणारे लहान मुले दिसत होती , कशाची तरी शरीरात ऊर्मी चढत होती , बस चालकाला आवाज दिला व बस थांबायला सांगितली बस मधून उतरलो व बस ला जाण्यास सांगितले , आता माझ्या घराच्या दिशेने मी पायी जात होतो व जीवन जगण्याचा मला एक नवीन ध्यास मिळाला होता , मनाने एक नवीन वेध घेतला व त्या दिशेने प्रवास सुरू केला 

     :- पवन नागोराव प्रभे *नामवंत*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

भारताचे संविधान कोणी लिहिले? प्रेम बिहारी नारायण रायजादा/ संविधान सभा/ मसुदा समिती

आपल्या सर्वांना माहीतच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अथक प्रयत्न करून भारतामध्ये जगातील सर्वात मोठी लोकशाही रुजवण्यात यशस्वी झालेत. जर...