तू गीता कुराण, मी भारताच संविधान
तू गीता कुराण, मी भारताच संविधान
तुझ्या माझ्या प्रेमाचा बस येवढाच संबंध आहे
तू गीता कुराण आणि मी भारताच संविधान आहे
सांगू नकोस तू की तेव्हा धार्मिक दंगली झालत्या
तुम्हाला सांभाळणारा मी धर्म निरपेक्ष आहे
तू गीता कुराण आहेस, मी भरताच संविधान आहे
काय झालं का तू अशी शांत शांत आहेस
शायद तुलाही गुलामगिरी मान्य नाही आहे
ये तू आणि वाच मला
तुझ्या एका एका प्रश्नाचे उत्तर मी आहे
तु गीता कुराण आणि मी भारताच संविधान आहे
चालायचे आहे तुला रस्तावर, घ्यायची आहे आकाशात उंच भरारी
मग रोकले कोणी तुला, का अशी बांधलेली आहेस
जात धर्म भाषा पंथ, हे सर्व एक अवडंबर आहे,
तू जेवढा विचार करशील, तेवढेच ते खोल आहे,
स्वतःला तू ओळखून घे, तुझे अधिकार तु जाणून घे
कोणत्याच आसमानी ग्रंथाने तुला जे सांगितले नाही
भारताचे संविधान जर तू कधी वाचले नाही
भारताचे संविधान जर तु कधी वाचले नाही
#नामवंत पवन नागोराव प्रभे (अमरावती *विदर्भ*)
https://youtu.be/9J-CFD3ojf8
तू गीता कुराण...मी भारताच संविधान