माझा बाप
जेव्हा जेव्हा आभाळ कोसळले
आठवतो माझा बाप
संकटाच्या वेळी धाऊनी येतो
येतो माझा बाप , येतो माझा बाप
दूर दूर त्या राणामध्ये
झिजतो माझा बाप
संकटाच्या वेळी धाऊनी येतो
येतो माझा बाप, येतो माझा बाप
श्रीमंत नाही जरी तो
श्रीमंती मध्ये जगवतो
हातामध्ये एक रुपया
कष्टाचा तो ठेवतो
दूर आभाळाला पाहतो मी
पाहतो घराच्या फाटक्या छापरातून
फाटक्या छापरातून दिसते
दिसते बाबाच्या कष्टाची भाकर
बनायान ती फाटलेली
दिसते उघडे भर अँग
दुःख ते विसरून उधळतो
हा उधळतो आयुष्याचे रंग
हा आयुष्याचे रंग
✍🏻पवन नागोराव प्रभे