गुरुवार, १७ जून, २०२१

नक्षलवाद ( मराठी )

नक्षलवाद
     नक्षलवाद हा शब्द आपल्यासाठी आज काही नवा नाही. जर कोणाला नक्षलवाद विषयी विचारले तर आतंकवाद्याचे दुसरे नाव हीच आपली व्याख्या राहणार. परंतु नक्षलवादी कोण नक्षलवादी कोणाला म्हणावे , त्यांचा जन्म कसा होतो त्यांच्या विषयी जाणून घेऊया .

     भारत १९४७ सली स्वतंत्र झाला परंतु भारताचा प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक इतिहास पाहता नक्षलवाद हा शब्द वाचण्यात आला नाही याचा अर्थ नक्षलवाद हा शब्द भारत स्वातंत्र्यमिळाल्यानंतर चा आहे.

नक्षलवाद हा शब्द कुठून व कसा आला :- 

     नक्षलवाद हा शब्द कोणत्यातरी एका समूहाचा नसून  आज पूर्ण भारत भर त्याचे स्वरूप पाहायला मिळते , ज्या ठिकाणी जंगलाचा भाग आहे आदिवासींचा भाग आहे अशा ठिकाणी नक्षलवादी समूह दिसून येतो,  पाचिम बंगाल मधील नक्षलवाडि‌ या गावातील काही नागरिकांनी सरकार विरूद्ध पुकारलेला बंड , या बंड पुकरणाऱ्या नक्षलवाडि गावावरून नक्षलवादी हा शब्द आलेला आहे , या मध्ये कोणतेच दुमत नाही.

भारतामध्ये नक्षलवादी या शब्दाची सुरुवात :- 

      भारतातील सर्वात जुना पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व त्याच बरोबर भारतीय कमुनिस्त पार्टी (२६ डिसेंबर १९२५ ) ही आहे . त्या वेळी केंद्रातील सत्ता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ची होती . केंद्राने केलेल्या काही कायद्याविरोधात बंगाल मधील जनतेने विरोध दर्शविला त्या विरोधकांमध्ये आणखी एक नेता चारू मुजुमदार चारू मुजुमदार हा कमुनिस्ट पार्टीचा नेता याने नेत्यांची भूमिका बजावली. यांनी सरकारच्या विरोधात सशस्त्र क्रांती ला सुरुवात केली . त्यांनी आपल्या विचारांशी मिळणारे अनेक नागरिकांना जमविले व एक सरकारच्या विरूद्ध लढणारी एक संघटना निर्माण केली .

     चारू मुजुमदार यांना खांद्याशी खांदा लाऊन मदत करणारे कानु सण्याल यांना नक्षलवाद्यांचे जनक सुद्धा म्हटले जाते .या दोघांची भेट सुद्धा जेल मध्ये झाली .त्या दोघांचे विचार हे मिळते जुळते असल्याने त्यांची घनिष्ट मैत्री झाली व त्यांच्या नवीन क्रांतीला येथूनच खरी सुरुवात झाली. 

     सरकारच्या भूमी अधिग्रहण या कायद्या विरोधात सर्वप्रथम नक्षलवाडि‌ येथूनच आवाज उठविण्यात आला त्यामध्ये चारू मुजुमदार व कानु साण्याल यांची प्रमुख भूमिका होती .याच आंदोलनाला शेवटी हिंसक वळण लागले , व त्यांना नक्षलवादी हे नाव पडले व तेच नाव आज पर्यंत चालत आहे. येथील नेत्यांचे म्हणणे होते की जमीन त्यांचीच जो जमिनीवर शेती करणार,. ज्यामुळे तेथील जमीन दारीवर घात होईल व तेथील लोकांची जी शारीरिक , आर्थिक, व मानसिक जी पिळवणूक होत होती त्याला कुठ तरी आळा बसेल , या आंदोलनाचा असा परिणाम पाहायला मिळाला की बंगाल मधे सत्ता पालट होऊन त्या ठिकाणी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाची सत्ता स्थापित झाली.

      नक्षलवाडि या ठिकाणावरून सुरू झालेला संघर्ष जवळपास भारतातील अनेक राज्यांमध्ये वणाव्यासारखा पसरला ,त्याचे अनेक परिणाम पाहायला मिळतात. सरकारणे केलेले नियम हे जर काही भागातील नागरिकांना मान्य नसतील तर विद्रोह हा होणारच व नक्षलवाद्यांचा जन्म हा होताच राहणार .

आढावा
     भारत हा एक लोकशाही प्रदान देश असून भारतात सशस्त्र उठावाला मंजुरी नाही. नक्षलवाद हा जांगलाकडिल ग्रामीण भागाकडे अधिक फोफावत असल्याचे कारण :- तेथील अक्षिक्षित पणा , हेतू परस्पर केलेले त्यांच्या कडे दुर्लक्ष , तेथील हिंसक कारवाई यांना न घातलेला आळा, त्यांना मिळत असलेली राजकीय नेत्यांची अदृश्य पने मदत अनेक कारणे सांगता येतील, या हिंसक वृत्तीच्या दिवसेंदिवस वाढणाऱ्या कर्यावाईंवर लगेच प्रतिबंध करणे गरजेचे आहे .परंतु हे नक्षलवादी आपली ढाल तेथील राहत असलेले आदिवासी यांना बनवितात 
  
      तसेच सरकारचे किंवा इतर कंपन्यांचे जंगलावर होणारे अतिक्रमण , आपल्या निजी स्वार्थासाठी त्यांचा वापर करून  घेणारे तेथील राजकीय व bussiness करणारे लोक, त्यांना न पटणारे संसदेत होत असलेले कायदे तसेच त्याभागातील सरकारी अधिकारी , Police ,CrPf किंवा इतर यांनी त्यांचे ना समजलेले प्रश्न असे अनेक कारणे असू शकतात . ज्यामुळे सर्वसामान्य माणसांना हाती शास्त्र घेण्यावाचून कोणताच पर्याय दिसत नाही .  व समाजाच्या अशा प्रवृत्तीला जशास तसे तोड देण्यासाठी हाती शस्त्र घ्यावी लागतात. 
नक्षलवाद विरोधात चालविलेले भारतातील अभियान :-

१) सळवा जुदुम
२) स्तीपलचेस अभियान १९७१
३) ग्रीन हंट अभियान २००९
४) प्रहार अभियान २०१७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

भारताचे संविधान कोणी लिहिले? प्रेम बिहारी नारायण रायजादा/ संविधान सभा/ मसुदा समिती

आपल्या सर्वांना माहीतच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अथक प्रयत्न करून भारतामध्ये जगातील सर्वात मोठी लोकशाही रुजवण्यात यशस्वी झालेत. जर...