माझ्याच माणसांनी
माझ्याच माणसांनी माझाच घात केला
मागे वळुनी जेव्हा पाहिले सर्व सत्यानाश केला।
समजले ज्यांना आपले, ते आपलेच निघाले
रक्तातील नाते दाखवत, विचार त्यांनी पुसले
आता कोणाला आता आपले म्हणावे
कोणाला आता आपले म्हणून जवळ करावे
ज्यांच्या साठी केले सर्व काही , ते म्हणाले काय केले
बुद्ध देऊनी तुम्हाला , तुम्ही बुद्ध सोडूनी गेले
सविधान म्हणुनी डोक्यावर घेउनी नाचता
सांगा एखादा भाग , तुम्ही काय लिहिता वाचता
असे कसे रे तुम्ही , २ पैशा साठी हापापले
भीम बुद्धाला बदनाम करून , असे काय तुम्हीं मिळविले
प्रगती करून मोठे व्हा , हेच पवन चे सांगणे आहे
बुद्धाला सोडून तुम्ही, भीमाच्या भाकरीला हराम झाले आहे .
( बुद्ध धम्माच्या जीवावर जे मोठे झाले , आणि थोड्या फायद्या साठी बुद्धाला सोडून पळाले, व भीमाच्या भाकरीला हराम झाले , त्या हराम खोरांसाठी )
✍️पवन नागोराव प्रभे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा