स्वप्न हे युगा युगा चे
आज पाहतो मी स्वप्न
खुल्या आभाळाचे
माझे स्वप्न हे आजचे नाही
हे आहे युगा युगा चे
जरी संपल्या वाटा माझ्या
रस्ता झाला अवघड
दाही दिशांतूनी येतील संकटे
मात करण्यास होणार पुढे
हा झेंडा कोणत्या कामाचा
तू घेउनी निघाला
धर्माच्या बेड्यांनी तुझा
रोखला रस्ता , तुझा रोखला रस्ता
चालूनी येतो हा चालुनी येतो....
थांबलास का तू,
कोणी थांबविले रे तुला
आव्हाने ही आजचीच
आव्हाने जग जरा हा आव्हाने जग जरा
मागे ओढणाऱ्यांचे हात तू
सोड जरा हा सोड जरा ..
माझे स्वप्न हे आजचे नाही
हे आहे युगा युगा चे ......
✍️पवन
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा