मी अधिकारी कसा होणार (भाग १)
ही लघु कथा भारतातील सर्व सामान्य घरण्यातीलच आहे ,ज्यांना वाटते की मला खूप मोठा अधिकारी व्हायचं आहे पण वाट्याला येणार मानसिक ताण यामधून त्याला सावरणे अवघड होऊन जाते व जगाच्या स्पर्धेत त्याला मागेच राहावे लागते . अशातीलच ही एक कथा आहे .
हे वर्ष पदवीचे शेवटचे वर्ष होते , प्रत्येकाने आपल्या जीवनाचे वळण कोणत्या दिशेने ओढायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न बनलेला होता , कोणाला अधिकारी तर कोणाला डॉक्टर , वकील , मास्तर , बिझनेस मन तर कोणी पुना म्हणजेच शेवटचा पर्याय शिकलेल्या मुलांचा कंपनी गाठायची , असा प्रतेकाने आपले ध्येय ठरविले होते , व कोणी असे पण होते ज्यांना आपले ध्येय ठरविता आले नाही ,
यावर्षीची पदवीची परीक्षा संपली पदवीचा निकाल जाहीर झाला व सर्वच आपल्या आपल्या ध्येय गाठण्यात व्यस्त झाले . या विद्यार्थ्यानं मधीलच गणू नावाचा विद्यार्थी त्याने पण जीवनात काही तरी करायचे ठरविले , पदवीची परीक्षा पास होताच त्याने तालुका गाठून MPSC ची परीक्षा देऊन अधिकारी होण्याचे ठरविले , पण घरची परिस्थिती हालाखीची असल्याने त्याला तालुक्याला भाड्याने खोली करून राहणे जमत नव्हते ,त्याने बस महामंडळ ची पास काढून रोज शिकवनीच्या class का जात असे त्याचा अभ्यास बऱ्यापैकी चांगला चालला होता रोज सकाळी घरचा जेवणाचा डबा घेऊन जायचे व रात्री 8,9 च्या दरम्यान घरी परत यायचे परंतु घरची आर्थिक परिस्तिती हलाकीची असल्याने त्याला काम करणे गरजेचे झाले होते .
घरी पैसे मागित होता पैसे मिळत होते पण त्याला घराची परिस्थिती पण दिसत होती, एक परीक्षेचा फार्म भरतो म्हटले तर हजार रुपये ते बाराशे रुपये जात असतं कधी कधी तर अशी पण वेळ यायची फार्म भरेल असला तरी पण परीक्षेला जाण्याची इच्या नसायची कारण एक परीक्षे मागे त्याला आई वडिलांचे स्वप्न दिसत होते ,परीक्षेला जात आहे म्हटल्यावर त्याला आई वडिलांचा चेहरा दिसायचा , परीक्षा देऊन आले तर आई बाबांची प्रश्नांची शराबत्ती असायची की आता निकाल कधी समजतो या पेपर मध्ये लागशिल ना , पास तर होशील ना आता बाबाच्या ने काम होत नाही , असे अनेक नानाविध प्रश्न त्याच्या समोर यायचे म्हणून घराच्यासमोर परीक्षेला जाणे म्हणजे खूप मोठा जुलूम होत होता आणि प्रत्येक वेळी पैसे मागणे त्याला आता कमी पणाचे वाटत होते. म्हणून त्याने आता निर्णय घेतला की आपण तालुक्याला खोली भाळ्याने करून राहायचे खूप अभ्यास करायचा पार्ट टाइम जॉब करायचा त्यामधून खोली भाळे द्यायचे व जेवण खोलीवर च बनवायचे , व शिल्लक राहिलेल्या वेळेत शिकवणी आणि खूप अभ्यास करायचा तसे ठरऊन , गणूने तालुक्याला रूम केली , खोली भाळ्या ने केली शिकवणी सुरू झाली अभ्यास जोमात होत होता एक दिवस खोली चा महिना संपला आता पैसे कुठून येणार , त्याने पैसे घरी मागायचे ठरविले , ठरविल्या प्रमाणे त्याने घरी पैसे मागितले पैसे मिळाले 2,3 महिने असेच सुरू राहिले एक वेळ घरी गेला असताना घरच्यांनी विचारले अभ्यास कसा काय सुरू आहे , त्यांचे बाबा सांगत होते जागा भरपूर निघाल्या , फार्म भरला न ते मागे फार्म भरला होता त्याचे काय झाले, गणुला काहीच समजत नव्हते काय बोलावे आणि काय सांगावे , पण हो ला हो म्हणणे गरजेचे होते , सरकार इकडे जागा काढत नाही , अभ्यास पण चांगला जोमात सुरू आहे .पण असे प्रश्न असले की नकारार्थी माणसाचे मन होऊनच जाते बगा, गणू दुसऱ्या दिवशी खोली वर गेला.............. Tobe.. Continue.....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा