शुक्रवार, १६ जुलै, २०२१

मी अधिकारी कसा होणार भाग २

मी अधिकारी कसा होणार भाग २
      गणू  दुसऱ्या दिवशी खोलीवर गेला , २,३ दिवस अभ्यास झालाच नाही , कारण त्याचे मन मनाला खात होते की आता काय करावे पैशांची अडचण आणि पाहिलेले स्वप्न , स्वप्नांना जेव्हा पैशांची सोबत असते असेच स्वप्न साकार होतात, गणुने खूप विचार करून कोणता तरी निर्णय घेतला व दुसऱ्या दिवशी शिकवणीला न जाता पार्ट टाइम नोकरी शोधायला गेला , तालुक्याच्या ठिकाणी पार्ट टाईम नोकरी कशी मिळणार हे त्याला कळून चुकले , त्याने मग पूर्ण दिवसाचा नोकरी करायची ठरवली , दिवसाला बारा तास काम करायचं आणि घरी येऊन स्वयंपाक करायचा व वाचलेला वेळेत अभ्यास करायचा  , काहीच दिवसात त्याला काम करून शिकणारे खूप मित्र जमविले व ज्यादा तर ज्यांनी काम करून अभ्यास केला त्यांनी अभ्यास सोडून देऊन फक्त कामच केले , आता तर गणु ला पण असेच वाटत होते की माझे पण भविष्य असेच तर नाही राहणार कारण बारा तास नोकरीचे कसे चौदा तास होत असतं कधीं कळायला वेळच मिळत नसे नंतर घरी जाऊन दोन तास स्वयंपाक आणि जेवण या मध्ये मिळत असतं जेथे १० ते १२ तास अभ्यास होत होता तेथे एक तास पण अभ्यास केला तर झोप येत होती , वेळ वाचविण्यासाठी जेवायचा डबा लावण्याचा विचार मनात आला  परंतु जेवणाचा डबा लावणे म्हणजे कामाचे पैसे डबा वाल्यांना देणे व पैशांची आता तर खूप गरज आहे , दोन महिन्यांनी गणू गावाला गेला आई वडिलांना सांगितले की मी तालुक्याला नोकरी करतो खोली भाडे निघून जाते व दोन पैसे पण शिल्लक उरतात घरच्यांना पण खूप आनंद झाला , घरच्यांचे पण एक टेन्शन दूर झाले ते म्हणजे पैशांचे कारण प्रत्येक फेरीला गणू पैशांचेच विचारायचा पण आता गणू नोकरी करतो म्हणजे पैसे मागणार नाही पण त्या वेळी गणू व त्यांच्या आई वडिलांना हे कळत नव्हते की पोराचा अभ्यास होत नाही तो कुठ तरी मागे जात आहे . असेच बरेच दिवस निघून गेले . गनुला स्पर्धा परीक्षेची तयारी करून ३ वर्ष उलटून गेली होती व घरचे पण याच आशेवर होते की गानुला सरकारी नोकरी लागणार , एक वेळी गणू UPSC च्या गोष्टी करणारा गणू ला आज साधी चपराशी च्या नोकरी वर पण विश्वास राहिला नव्हता कारण तालुक्याला असून सुद्धा त्याला त्याची नोकरी व घरी येऊन करीत असलेला स्वयंपाक या पलीकडे काहीच दिसत नव्हते . गणू आत मधूनच तुटत असे  पण सांगणार तर कोणाला त्याने स्वतःच तयार केलेले मनोराज्य ते म्हणजे नकार तेचे नकारात्मक विचारांचे , हेच नकारात्मक विचार त्याला रोज संपवित असे .





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

भारताचे संविधान कोणी लिहिले? प्रेम बिहारी नारायण रायजादा/ संविधान सभा/ मसुदा समिती

आपल्या सर्वांना माहीतच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अथक प्रयत्न करून भारतामध्ये जगातील सर्वात मोठी लोकशाही रुजवण्यात यशस्वी झालेत. जर...