राष्ट्रीय आंदोलन
गांधी युग १९२० ते १९४७ ,
गांधीजींच्या जीवनातील महत्त्वाचे आंदोलन :-
१) चंपारण्य सत्याग्रह :-. गांधीजी १९१५ साली दक्षिण आफ्रिका मधून परत आले. आल्यावर त्यांनी भारताचे व भारतीयांचे अवलोकन केले. गांधींची सुरवात पासूनच ख्याती संपूर्ण भारतभर पसरलेली होती.
त्या काळात ब्रिटिश सरकार कडून बिहार मधील चंपारण्य या ठिकाण मधील शेतकऱ्यांवर नीळ लागवळीसाठी जबरदस्ती केली जात होती. त्या ठिकाणी गांधीजींनी आपल्या जीवनातील पाहिले आंदोलन (१९१७) भारतात केले.
२) खेडा सत्याग्रह :-
गांधीजींच्या जीवनातील दुसरे महत्त्वाचे आंदोलन म्हणजे खेडा आंदोलन (१९१८) होय. गांधीजींनी कर वसुली विरूद्ध केलेला लढा . यामध्ये सुद्धा गांधी विजयी झाले व सर्व शेतकरयांना न्याय मिळवून दिला .
३) असहयोग आंदोलन :-
गांधी च्या जीवनातील सर्वात महत्त्वाची तीन आंदोलन आहेत , त्या मधील सर्वात महत्त्वाचे आंदोलन म्हणजे *असहयोग आंदोलन* ज्या आंदोलनामुळे गांधी हे संपूर्ण भारत भर पोहोचले,
पंजाब मध्ये घडलेला जलियन वाला बाग हत्याकांड या मध्ये झालेला भारतीयांचा नरसंहार यांमुळे भारत देशाला च नाही तर संपूर्ण जगाला खूप मोठा धक्का पोहोचला . या विरोधात गांधींनी असहयोग आंदोलनाला सुरुवात केली . परंतु उत्तर प्रदेशातील चौराचौरी या ठिकाणी आंदोलनाला हिंसेचे वळण लागल्यामुळे गांधीजींनी आंदोलनाला मागे घेतले . परिणामी गांधी पासून बरेच लोक दुरावले .
४). दांडी यात्रा :-
गांधीजींच्या महत्त्वाच्या आंदोलन पैकी दांडी यात्रा हे आंदोलन ला सुद्धा अधिक महत्त्व आहे . ब्रिटिश सरकारच्या नवीन नियम व नवीन कायदा द्वारे भारतीय मिठावर कर लाविल्या जात होता. त्या विरोधात गांधीजींनी १२ मार्च पासून तर ६ एप्रिल पर्यंत आंदोलन केले अहमदाबाद पासून तर दांडी पर्यंत पायी चालून (सरासरी ४०० km ) हे आंदोलन पूर्णत्वास नेले . या आंदोलनामध्ये ८०,००० पेक्षा हि अधिक क्रांतिकारकांना या आंदोलन करतांना कारावासाची शिक्षा झाली
५) चले जाव चळवळ :-
दुसरे महायुध्द १९३९ साली सुरुवात झाली . ते १९४५ पर्यंत त्याच वेळी ८ ऑगस्ट १९४२ ला भारतीयांनी गांधीजींच्या नेतृत्वात चले जाव चळवळीचा प्रारंभ केला ही चळवळ १-२ वर्ष चालली .
६) गांधीजींची हत्या :-
भारताचे विभाजन होऊन भारतापासून पाकिस्तान ची निर्मिती करण्यात आली , व पाकिस्तानला काही रुपयांची मदत सुद्धा करण्यात आली. या कारणाने गांधींवर अनेक लोक नाराज होते . गांधीजी नवी दिल्ली मधील बिडला हाऊस या समोरील मैदानामध्ये सभेमधील आपल्या साथीदारांसह होते त्यांचं वेळी नथुराम गोडसे यांनी नारायण आपटे याला आपल्या आपल्या हाताशी धरून ३० जानेवारी १९४८ रोजी बंदूक मधील गोळी झाडून गांधींची हत्या करण्यात आली . नथुराम गोडसे याला १५ नोव्हेंबर १९४९ रोजी गांधी हत्येमुळे फाशी देण्यात आली तर नारायण आपटे यांना कारावास ची शिक्षा झाली .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा