राष्ट्रीय आंदोलन (भाग सहा)
गांधी युग (१९२० ते १९४७)
गांधीजींनी भारतात केलेले कार्य, चळवळ ई. ना गांधी युग म्हणून गौरवण्यात आले आहे .
जीवन कार्य :-
गांधीजींचे संपूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे आहे . त्यांचा जन्म गुजरात मधील पोरबंदर या ठिकाणी २ ऑक्टोबर १८६९ रोजी झाला .त्यांच्या आईचे नाव पुतलीबाई . गांधीजींचा विवाह १३ वर्षाचे असतांनाच कस्तुरबा बाई मकनजी यांच्या सोबत झाला. मोहनदास करमचंद गांधी आणि कस्तुरबा गांधी यांच्या विवाहानंतर त्यांना चार पुत्र रत्न प्राप्त झाले.
१) हरीलाल गांधी , २) मनीलाल गांधी
३) रामदास गांधी , ४) देवदास गांधी
गांधी जी आपल्या पुढील शिक्षणासाठी व वकिली व्यवसाय साठी लंडन या ठिकाणी गेले, त्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर गांधी भारतात परतले परंतु त्यांची वकिली या व्यवसायावर पकड न बसल्याने , व त्यांना जे संपादन करायचे होते ते संपादन न होत असल्याने , म्हणून त्यांनी १९९३ मध्ये द. आफ्रिका जो ब्रिटिश राज्याचा एक भाग होता . त्यांच्या सोबत एक वर्षाचा करार करून द. आफ्रिकेला जाण्याचे ठरविले .
गांधीजींचे दक्षिण आफ्रिकेमधील आंदोलन :-
गांधीजी ला काही दिवसातच द. आफ्रिकेमध्ये वर्णद्वेश , भेदभाव ई चा सामना करावा लागला . रेल्वे डबे मधील पहिल्या डब्यातील तिकीट असून देखील त्यांना रेल्वेतून बाहेर ढकलून देण्यात आले . व त्यांना एका युरोपियन व्यक्तीकडून मार पण खावा लागला . भारतीय संस्कृती प्रमाणे त्यांना टोपी घालने आवडत होते परंतु तिथे न्यायाधीशांनी टोपी न घालण्यासाठी आदेश दिला . त्यांना तिथे अनेक समस्यांना सामना करावा लागत होता. तेथूनच त्यांच्या जीवनाची एक नवीन दिशेला सुरुवात झाली. व त्या नवीन मिळालेल्या मार्गाने गांधीजी चालत होते . दक्षिण आफ्रिकेमध्ये भारतीयांना मिळत असलेली हिन दर्जाची वागणूक या विषयी गांधीजींनी प्रश्न विचारण्यास सुरुवात केली व ते भारतीयांचे प्रश्न सरकार मांडण्यास यशस्वी होत होते.
भारतीय राष्ट्रीय आंदोलनाची महत्त्वाची भूमिका :-
दे दि हमे आझादीं
बिना खड्ग बिना ढाल
साबरमती के संत तूने
कर दिया कमाल,
:- कवी प्रदीप
या वरील ओळीप्रमाने सांगावेसे वाटते की , गांधियुग हे गांधीजींची भारतातील चळवळीचा कालखंड आहे . ज्यामध्ये हिंसा नव्हती तर महावीर बुद्ध यांची अहिंसा होती. गांधीजी सुरुवाती पासूनच शांततेच्या मार्गाने चालत होते . या कारणामुळेच गांधींवर अनेक टीका होत होत्या . भारतातील तरुण वर्गाने त्यांच्या कडे पाठ फिरविली होती तरीपण गांधी आपल्या वाटेने चालत होते व चालत असताना त्यांनी हजारो लोकांना सोबत घेऊन भारतीय स्वातंत्र्य मिळविण्यासाठी आपले व आपल्या सहकाऱ्यांचे अतुलनीय योगदान या भारत मातीसाठी दिले .
१) चंपारण्य सत्याग्रह :-
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा