निळावंती ग्रंथ (भाग ७)
निळावंती ग्रंथाबद्धल आणखी माहिती :-
निळावंती ग्रंथ हा अघोरी विद्या संबद्धित असल्याने त्या ग्रंथावर स्वतंत्र्यपूर्व काळात म्हणजेच १९३२-३५ च्या दरम्यान भारत सरकारने हा ग्रंथ छापण्यावर बंधि घातली आहे .
आता हे ग्रंथ फक्त गुरु पासून ते शिष्याकडे चालत असलेली तोंडी ज्ञान आहे . ज्यामुळे असे अनेक मंत्र सांगितल्या गेलेत की , अन्न खराब होऊ नये , गुप्त धन कसे शोधावे . कोणाच्या मनातील कसे समजावे , वस्तू कोणी चोरली कसे समजावे ई. असे मंत्र हे परंपरेने चालत आलेले आहे . उदा :- काही वर्षा अगोदर दरवाजावर येणारा पिंगळा यांना मानसशास्त्राचा ज्ञानी असे सुद्धा म्हटल्या जात असे, त्यांना अनेक पशू - पक्षांच्या आवाजाचे सुद्धा ज्ञान असल्याचे सांगितल्या जाते , हा म्हणजे हा पिंगळा निराशतेने भरलेल्या माणसांच्या मनात आशावाद निर्माण करणारा असतो.
निळावंती ग्रंथ कोणाला मिळाला तरीही तो त्या व्यक्तीला वाचताच येईल असे नाही . कारण निळावंती या ग्रंथाची लिपी ही आज समजणार असे वाटत नाही, कारण निळावंती ग्रंथ हा हजारो वर्षां पासून चालत आलेल्या अघोरी विद्येच्या ज्ञानाचा साठा आहे . त्याची लिपी ही संस्कृत भाषेत व मोडी लिपीत लिहिलेले श्लोक आहेत, परंतु आज इंग्रजी व इतर भाषांच्या तुलनेत मोडी लिपी व संस्कृत लिपी हरवलेली आहे.
निळावंती ग्रंथ कसा वाचावा :-
निळावंती ग्रंथा विषयी अनेक श्रद्धा व अंधश्रद्धा आहेत , व आज हा ग्रंथ उपलब्द असणारच असे नाही , पुस्तक संग्रहालय मध्ये किंवा पुस्तकांच्या दुकानात किंवा नेट वर या पुस्तकांची मार्केटिंग केली जाते . ते असलेले निळावंती ग्रंथ मुळ ग्रंथ नसून फक्त कथा स्वरूपात आहे .
अनेक ठिकाणावरून माहिती गोळा करून असे समजले की , गरोदर बाई चा मृत्यू झाल्यावर तिच्या प्रेताची विल्हेवाट लावताना तिला जो अग्नी दिला जातो त्याच अग्नीच्या प्रकाशात हा ग्रंथ वाचून पूर्ण करावा . तेव्हा या ग्रंथातील ज्ञान त्या व्यक्तीला प्राप्त होते जगात असलेले सर्वच प्राण्यांची भाषा , मंत्र सर्वच या ग्रंथातून प्राप्त होते .
तसेच या ग्रंथामध्ये वेगवेगळे अंजन तयार करण्याची विधी पण सांगितली आहे . जसे की , जमिनीखाली गुप्त धन लपविलेले असेल त्याविषयी अंजन तयार करून डोळ्यांमध्ये लाविले तर निश्चित असलेल्या ठिकाणी गुप्त धन पाहू शकतो . जर चोरांचा शोध लावायचा असेल त्यांची पण विधी सांगितली आहे . ज्यामुळे चोरांचा चेहरा पाण्यामध्ये पाहता येऊ शकतो.
वरील प्रमाणे निळावंती व निळावंती ग्रंथ या विषयी माहिती सांगितली आहे ही सर्व माहिती अनेक ठिकाणावरून गोळा करून प्रसिद्ध केल्या गेलेली आहे .मी स्वतःहा सुद्धा हा ग्रंथ शोधण्याचा खूप प्रयत्न केला परंतु प्रत्येक ठिकाणावरून निराशाच पदरात पडलेली आहे .
हा संपूर्ण लेख कथेच्याच स्वरूपात मानावा व वाचावा या लेखातील माहिती सुद्धा परंपरेने चालत आलेल्या कथेवर आधारित आहे . मी या कथेला परिपूर्ण सत्य आहे असे मानीत नाही .