निळावंती ग्रंथ (भाग ५)
निळावंती च्या वैवाहिक जीवनाला सुरुवात :-
निळावंती आपला प्रवास करीत गावामध्ये पोहोचते व तिच्या वैवाहिक जीवनाला सुरुवात होते . निळावंती दर रात्री आपल्या शयन कक्षातून बाहेर जाते . अटी प्रमाणे तिचा पती तिच्या मागे जाऊ शकत नाही व निळावंती तेव्हाच घराच्या बाहेर पडायची की तिची संपूर्ण खात्री होईल की तिचे परिवार वाले झोपले असतील .
एके रात्री निळावंती घरचे सर्व झोपले असल्याची खात्री करून घेते ती नेहमी प्रमाणे मध्यरात्री आपल्या शयन कक्षातून बाहेर पडते तेवढ्यात तिला एका कोल्याची कोल्हेकुई ऐकू येते , निळावंती ला सर्व प्राणी मात्रांचे आवाजाचे ज्ञान असल्याने निळावंती सर्व समजून जाते . ती आणखी समोर गेल्यावर तिच्यासोबत घुबड बोलते व तिला सांगते की , तुला तुझ्या लोकांत जाण्याची वेळ आलेली आहे . या ठिकाणी आपल्यांना समजते की, निळावंती ही आयुष्यभर इथे राहण्यासाठी आलेली नव्हती व ही एक देव लोकातील स्त्री असणार जी पृथ्वी वर कुठेतरी वाट चुकलेली आहे , तिची आता तिच्या लोकांमध्ये जाण्याची वेळ आलेली आहे त्यासाठी तिला गावाशेजारील दिव्य नदी पार करावी लागणार त्यासाठी तेथे एक नाविक असणार आहे जो तिला ती दिव्य नदी पार करण्यासाठी मदत करील त्यासाठी त्या नविकाला त्यांच्या करारानुसार काही तरी देणे गरजेचे असते आणि ती वस्तू नाविकाला देण्यासाठी आज रात्री तिला मिळणार आहे व ती आपल्या लोकांत जाऊ शकेल .
नदीचा उगम ज्या ठिकाणावरून होत असतो तिथे युद्ध सुरू राहते , त्या युद्धातील एक सैनिक चा मृतदेह त्या नदीतून वाहत जात असतो , त्या मृतदेहाच्या कमरीला एक ताईत बांधलेले असते त्या ताईत चा आपला एक इतिहास असतो, परंतु या ठिकाणी तो ताईत त्या नदीवरील नाविकाला दिल्यास तो नाविक निळावंती ला नदी पार करून देणार होता व निळावंती आपल्या लोकांत जाऊ शकणार होती, तेवढ्यात तो मृतदेह नदीमधून वाहत येत असतो , निळावंती त्या मृतदेहाला पकडण्यासाठी नदीमध्ये उडी मारून त्या मृतदेहाला पकडते व त्याच्या कमरीचे ताईत काढण्याचा प्रयत्न करते परंतु त्या ताईत ची गाठ पाण्यामुळे आणखी फिट झाल्यामुळे तिला ती गाठ सोडणे कठीण होऊन जाते , म्हणून निळावंती ती गाठ आपल्या दातांनी सोडण्याचा प्रयत्न करते , आता या ठिकाणी तिचा पती येवढ्या रात्री तिचा पाठलाग करीत होता व तो नदीच्या किनाऱ्यावरून तिला पाहत होता , निळावंती ताईत ला आपल्या दातांच्या साहाय्याने सोडविण्याचा प्रयत्न करीत होती, पण तिच्या नवऱ्याला व त्यांच्या साथीदारांना वाटत होते की ही मृतदेह आपल्या दातांनी कुरतडून खात आहे , त्यामुळे किनाऱ्यावरील सर्वच लोक तिच्याकडे किळसपणे पाहत होते निळावंती जेव्हा ताईत घेऊन किनाऱ्यावर येते , तेव्हा कोणीही विचार पण केलेला नसणार अशी घटना घडते . निळावंतीचा जो नवरा आहे तो तिचा पाठलाग करीत असतो , तो एका राक्षसाचे रुप धारण करतो व निळावंतीवर जादूचा प्रयोग करून तिचे जवळील ताईत घेऊन जंगलाच्या दिशेने पळत सुटतो हे सर्व अचानक पने घडल्यामुळे निळावंतीला धक्का पोहचतो व निळावंती आपले रूप बदलून ती पण जंगलाच्या दिशेने पळत सुटते , आता या ठिकाणी निळावंतीने जे ज्ञान हजारो प्राणी मात्रांकडून मिळविले होते व तिच्या जवळील सर्वच ज्ञान जे निळावंतीने ताम्रपटावर लिहून ठेवले होते , ते सर्व निळावंती त्याच ठिकाणी सोडून देते , सोबत असलेल्या गावातील लोकांनी ती सर्व ताम्रपट गोळा करून तो ग्रंथ स्वरूपात तयार केला व आज तो निळावंती ग्रंथ म्हणून प्रसिद्ध आहे .
अशी निळावंती व तिच्या ग्रंथाबद्दल एक बाजू सांगितली जाते , दुसरी बाजू अशी की, त्या पवित्र नदिमधून वाहत येणाऱ्या प्रेत ला पकडून निळावंती त्या प्रेतच्या कमरेला बांधलेल्या ताईत ला सोडविण्याचा प्रयत्न करते परंतु ती गाठ घट्ट असल्याने हाताने सोडणे कठीण होऊन जाते , म्हणून ती आपल्या दातांच्या साहाय्याने गाठ सोडविण्याचा प्रयत्न करते , परंतु तेवढ्यात निळावंती चा नवरा त्या ठिकाणी येतो व त्याला वाटते निळावंती दाताने प्रेताला कुरतडून खात आहे , असे तिचा नवरा व त्यांच्या सोबत आलेले गावकरी असे दृश्य जेव्हा पाहतात तेव्हा तिचा नवरा तिला सोडून जातो व निळावंती ही एकटी होते अशी आणखी एक कथा निळावंती व तिच्या ग्रांथाबद्दल सांगितली जाते .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा