गुरुवार, २ सप्टेंबर, २०२१

निळावंती (भाग ६)

निळावंती ग्रंथ (भाग ६)
निळावंती ग्रंथाबद्दल आणखी महत्त्वाचे :-

१) निळावंतीला अनेक प्राण्यांच्या आवाजाचे ज्ञान होते व या ग्रंथात त्या आवाजाचे विश्लेषण केलेले आहे , मुंगीचा आवाज सिखण्यापासून तर तंत्र - मंत्र , अनेक गूढ विद्या विषयी या ग्रंथात माहिती सांगितली आहे .

२) आध्यात्म विषयी लिखाण व प्रचार प्रसार करणारे हैंबतीबाबा पुसेसावळीकर यांनी ही निळावंती ग्रांथाविषयी अनेक स्लोक लिहिलेले आहेत असे आढळते .

३) १६०५ ते १६२५ च्या दरम्यान दुसरे भास्कराचार्य यांचा एक लिलावती ग्रंथ प्रसिद्ध झालेला होता. दुतीय भास्कराचार्य यांनी लिहिलेला लिलावती ग्रंथ व मुळात असलेला निळावती ग्रंथ या दोन्ही ग्रंथामध्ये खूप फरक आहे . अर्थात ही दोन्हीही ग्रंथ वास्तवात वेगळे आहेत कारण मुळ निळावंती ग्रंथ आपण पाहिलेल्या अघोरी विद्या , गुप्त धन , पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या सर्वच प्राणीमात्रांची भाषा , काळी जादू या सर्वांच्या संबधित आहे तर 

     भास्कराचार्य यांनी लिहिलेला लिलावती ग्रंथ हा कोणत्याही कालीजादु , अघोरी विद्या , पशुपक्षी यांची भाषा अवगत करण्याची कला श्लोक या विषयी नाही. भास्कराचार्य यांनी लिलावती लिहिण्यामागचे असे कारण सांगता येईल की , भास्कराचार्य यांना लिलावती नावाची एक मुलगी होती . तिच्या नावावरून दुत्तीय भास्कराचार्य यांनी गणित शास्त्र विषयी लिलावती हा अठरा ते वीस पांनाचा ग्रंथ लिहून पूर्ण केला होता . या लिलावती ग्रंथामध्ये सुद्धा अनेक श्लोक सांगितले आहेत परंतु ते श्लोक गणित शास्त्र विषयी आहेत . तर दुसरी कडे असे सांगितले जाते की लिलावती ही भास्कराचार्य यांची मुलगी नसून त्यांची पत्नी आहे . 

४) दुर्गा भागवत :- यांची लिखाणात अतुलनीय कामगिरी असून त्यांना संशोधनावर लिखाण करण्यात आवड होती व त्यांचे अनेक ग्रंथ प्रसिद्ध आहेत . दुर्गा भागवत यांनी सुद्धा निळावंती या ग्रंथाची मूळ प्रत शोधण्याचा प्रयत्न केला . असा त्यांनी प्रासंगिका या ग्रंथात उल्लेख सुद्धा केलेला असल्याचे दिसून येते व त्यांनी त्यांच्या लेखनिद्वारे स्पष्ट केले की , स्वामी विवेकानंद यांनी तो ग्रंथ वाचून पूर्ण केलेला आहे , म्हणून त्यांचा मृत्यू ची वेळ येण्या अगोदरच निळावंती ग्रंथ वाचून पूर्ण झाल्यावर सहा महिन्याच्या आत स्वामी विवेकानंद यांचा मृत्यू झाला ..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

भारताचे संविधान कोणी लिहिले? प्रेम बिहारी नारायण रायजादा/ संविधान सभा/ मसुदा समिती

आपल्या सर्वांना माहीतच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अथक प्रयत्न करून भारतामध्ये जगातील सर्वात मोठी लोकशाही रुजवण्यात यशस्वी झालेत. जर...