मंगळवार, १८ जानेवारी, २०२२

अनाथांची आई .., सिंधू ताई सपकाळ

अनाथांची आई
नजरा खिळत होत्या 
पदर जो फाटलेला होता
या बईमान जिंदगी ने
हात माझा पकडला होता

निसटत चालले होते आयुष्य
नकोसे ते दिवस होते
फिरून फिरून या जिंदगाणीला
हळ्यांच्या चोचीसारखे टोचत होते

सांगायचे होते कोणाला
घरच्यांना की दारच्यांना
मृत पावलेले अश्रू माझे
सोबती केले त्या अनाथांना 

फिरत होती पोटासाठी
वासनेच्या नजरा त्या झेलत होती
वाचविण्यासाठी या इज्जतीला
स्मशानात सुद्धा झोपत होती

बाई ची आई होता होता
दुःखाचा पहाड कसा चढून गेली
सोबती न कोणी माझे होते
अनाथांची आई कशी होऊन गेली

  #नामवंताच्या कविता दिनांक ४ जानेवारी २०२२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

भारताचे संविधान कोणी लिहिले? प्रेम बिहारी नारायण रायजादा/ संविधान सभा/ मसुदा समिती

आपल्या सर्वांना माहीतच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अथक प्रयत्न करून भारतामध्ये जगातील सर्वात मोठी लोकशाही रुजवण्यात यशस्वी झालेत. जर...