शुक्रवार, २१ जानेवारी, २०२२

थंडीचा महिना ( वर्हाडी कविता )

थंडीचा महिना
२०२२ चा पहिला महिना 
थंडी पण सरायचा नाव घेईना 
ज्या ज्या घरांची लांबी लांबी भिंती
शेकोटीच कुठ पेटलेली सापडेना 

गल्लीवर उभा राहून 
जेव्हा दूर - दूर मी पाहतो
दुपटाच पांढर वार 
काय माहित कुठ हरविल

ज्याच्या त्याच्या घरातून
आवाज येतो मोठ्याने टिव्हीचा 
थंडी हाय की नाही हाय 
मालुमचत पडत नाही

सकाळी सकाळी दुलाईच
असते लयच गरम - गरम
चहा सोबत खायला 
मिळते ब्रेड अन पाव नरम नरम 
 
घराशेजारच्या झाडावर 
पक्षांची चिवचिवाट असते 
थंडीचा महिना लयच
बहारदार दिसते....

#नामवंत_प्रभे अमरावती 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

भारताचे संविधान कोणी लिहिले? प्रेम बिहारी नारायण रायजादा/ संविधान सभा/ मसुदा समिती

आपल्या सर्वांना माहीतच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अथक प्रयत्न करून भारतामध्ये जगातील सर्वात मोठी लोकशाही रुजवण्यात यशस्वी झालेत. जर...