काणु सन्याल :-
नक्षलवादी आंदोलनाचे जनक तसेच एक प्रभावी नेता म्हणून कानू सन्याल यांचे नाव घेतले जाते . कानु सन्याल यांचा जन्म पश्चिम बंगाल मधील दार्जिलिंग जील्हामध्ये कर्सियांग या गावामध्ये झाला , त्यांचे वडील आनंद गोविंद सन्याल हे एका कोर्टमध्ये नोकरीला होते.
कानु सन्याल यांनी आपले शिक्षण अर्धवट सोडून दिले व दार्जिलिंग मध्येच कलींगपोंग कोर्टमधे नोकरीला सुरुवात केली , त्या वेळी बंगाल मध्ये इंडियन काँग्रेस ची सत्ता होती , बंगाल चे मुख्यमंत्री विधान चंद्र राय होते . कानु सन्याल ने एक दिवशी बंगाल चे मुख्यमंत्री यांना काळे झंडे दाखऊन विरोध दर्शविला , या आरोपाखाली कानु सन्याल ल पकडून कारावासाची शिक्षा झाली. त्याच कारावास मध्ये कानु सन्याल ची भेट चारू मुजुमदार या नेत्याशी झाली , दोघांचे विचार जुळल्याने त्यांच्या मध्ये घनिष्ट मैत्री झाली . नंतर कनु सन्याल ने भारतीय कम्युनिस्ट पार्टी चे सभासदत्व स्विकारले .
कानु सन्याल यांनी त्यांच्या विचाराशी जुळणाऱ्या कार्यकर्त्यांना हाताशी धरून नक्षली विचारांना प्रोत्साहन देणारी अनेक कार्यवाही केल्या व त्यामध्ये प्रमुख तेची भूमिका स्वीकारली .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा