शुक्रवार, १६ जुलै, २०२१

मी अधिकारी कसा होणार भाग ३

मी अधिकारी कसा होणार भाग ३
     गणू काही दिवसांनी गावाकडे गेला , पण गावात तो कोणाशीच जास्त बोलत नसे , घरी पण बोलताना चीड चीड करीत असे , गणू च्या वागण्यात होत असलेला बदल त्याच्या वडिलांच्या नजरेतून तो चुकाऊ शकला नाही. गणूच्या वडिलांनी गणु ला धीर देत म्हटले की , बाबू तुझा अभ्यास कसा सुरू आहे , तुझा अभ्यास तर होतो ना , गणू ने त्यांच्या वडिलांकडे निराशतेने पाहिले , त्यांचे वडील समजून गेले परंतु गणू जो पर्यंत बोलणार नाही तो पर्यंत त्याचे वडील काहीच करू शकत नव्हते , बऱ्याच वेळानंतर गणू उत्तरला , " बाबा जेव्हा पासून नोकरी करीत आहे तेव्हा पासून अभ्यास फक्त नावाचाच सुरू आहे " गणू ने सर्व सांगितले , गणू जेव्हा सांगीत होता जवळ त्याची आई पण बसलेली होती , गणुची आई गणु ला धीर देत म्हणाली , " बाबू एका दिवसात कोणीही मोठा माणूस होत नाही पण एक दिवस माणूस हा मोठा माणूस जरुर होतो " आई चे बोलणे ऐकून गणू थोडा सुखावतो , गणू चे वडील " बाबू तुला महिन्याचा खर्च किती येतो ते मला सांग "  गणूची आई " आपले मूल आपल्याला ओझे थोडी होणार आहेत , आपण गणु ला खूप शिकऊ " गणू आपल्या महिन्याचा खर्च सांगतो . व गणू काही पैसे घेऊन पुन्हा तालुक्याला येतो. गणू पुन्हा नव्याने अभ्यासाला सुरुवात करतो व खूप मन लाऊन अभ्यास करतो, नोकरी करीत असताना त्याने जमविलेले मित्र आता गणुचा वेळ खात होती , त्याच्या मित्रांचे अभ्यासाशी कोणतेही नाते नव्हते , ते दिवसातून कधीही येत असतं व गणुच्या खोली वर थांबत असत , गणुचे ते चांगले मित्र असल्याने गणू पण त्यांचे मन दुखावेल असा वागला नाही पण , परंतू तो किती दिवस स्वतःला समजावेल गणू त्यांना दुर्लक्षित करीत होता , त्यांचा फोन उचलणे कमी केला , ते खोली वर येत आहेत असे माहीत झाले तर तो खोलीच्या बाहेर जात होता , त्यांना कधी कधी टोचून बोलत असे , असे गणूचे खूप दिवस चालले , गाणूने पुन्हा आपल्या अभ्यासावर विजय मिळविला त्याचा अभ्यास पहील्यानपेक्षा ही अधिक चांग ला झाला , त्याला आणि त्याच्या अभ्यास करणाऱ्या मित्रांना अशी पूर्णपणे खात्री होती की आता गणू पोस्ट तर नक्की काढणार.

      बरेच दिवस झाले गणू गावाकडे गेलेला नव्हता , त्याला गावाकडची आठवण पण येत होती, आणि तेवढ्यातच एक आठवण म्हणून त्याच्या आई चा फोन आला , बरेच बोलणे झाल्यावर त्याच्या आईने त्याला काही दिवसांसाठी घरी बोलाविले भेटण्यासाठी गणू ला पण घरच्यांची भेट घ्यायची होती , बरेच दिवस झाले होते . To ... Be... Countinue...




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

भारताचे संविधान कोणी लिहिले? प्रेम बिहारी नारायण रायजादा/ संविधान सभा/ मसुदा समिती

आपल्या सर्वांना माहीतच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अथक प्रयत्न करून भारतामध्ये जगातील सर्वात मोठी लोकशाही रुजवण्यात यशस्वी झालेत. जर...