रविवार, १८ जुलै, २०२१

मी अधिकारी कसा होणार भाग ४

मी अधिकारी कसा होणार भाग ४
     बरेच दिवस झाले होते गणू गावाकडे गेला नव्हता, गणुला पण घरची आठवण येत होती, गणू काही दिवसांसाठी घरी जाण्याचे ठरवितो, कारण त्याला निघालेल्या जागेसाठी खूप काही अभ्यास करायचा असतो, व बरेच दिवस त्याचे गावाकडे येणे होणार नाही , म्हणून काही दिवसांसाठी गणू गावाकडे येण्याचे नीच्छित ठरवितो, गणूचा 5,6 दिवसांचा मुक्काम ठरलेला म्हणायचा, म्हणून घरी येण्याच्या अगोदर गणू सर्व मित्रांची भेट घेतो, व गावाकडे निघतो, गनुचा चांगला अभ्यास होत असल्याने गणू मनात ठरवितो की आता जी post येणार ती exam देऊन  लवकरात लवकर नोकरीला लागायचे व समोरील exam सुद्धा देऊन वरील post काढायची तो त्याच्या मनातच बरेच काही विचार करून ठेवतो. गणू गावाकडे येतो , भेटणारे अनेक लोक त्याच्या कडे येतात , कारे गणू काय चालू आहे मग, काय करतो तू तालुक्याला , कारे किती दिवसाचा लागलाच नाही काय, माय बापला किती फसवितो  , अनेक नकारात्मक लोक गणु ला भेटत होते पण गणुवर त्यांचा प्रभाव काहीच पडत नव्हता , कारण त्याचा विश्वास त्यांच्या आई बाबांवर अधिक होता त्यांच्या मेहनतीवर अधिक होता, गणु ला जेव्हा त्याच्या शाळेतील काही मुलं भेटत होते, ते पण पुणा राहणारा , कारे गणू काय करतो लेका काम गिम कर, मला तर काम करावेच लागते , तुझ चांगलं आहे बा , तुझे माय बाप तुला पोचतात, आमचे माय बाप आम्हाला नाही पोचत, आम्हाला काम करावेच लागते , आणखीन काही मित्र भेटल्यावर , म्हणजे जुने शाळेतील मित्र जे 10 पर्यंत सोबत शाळेत जाणारे होते, कारे गणू,, काय काम करतो मी काही तरी करायला पाहिजे लेका, मी जास्त नाही शिकलो पण मी माझ्या बहीण भावाला खूप शिकवले, तूले काही शिक्षणाच्या बर्यात माहिती पाहिजे त मले विचार मी अशीच चांगले च सांगतो मित्रांना , असे चांगले कोणी सांगत नाही आजकाल ( आता बघा गणू गणू च M A पूर्ण शिक्षण झाले पण हा 10 वी शिकलेला मुलगा गणू ला सांगतो की मी शिक्षण विषयी तुला माहिती सांगतो , कारण एकच की गणू अभ्यास करीत होता पण पैसे कमवित नव्हता, ) तू असे करण रे गणू तू MPSC ले asmission घे ते शाळा तालुक्याला पाय असेल तर ( गणू स्वतः हा MPSC करीत आहे , पण त्याच्या मित्राला हे पण माहित नाही की MPSC काय असते तर ) तो गेल्यानंतर गावातला मित्र भेटतो , काय गणू काय चालू आहे ताल तालुक्याला तू नोकरी वर लागला म्हणते , मी काय म्हणतो मले 30रुपये देणं मी तुले उद्याच वापस करतो, थोडी घेतो म्हटले 30 रुपये ची भेटते, कधी त मागीत नाही तुले , कधी त कामात पड, कधी तर माहीत नाही तुले,  असे अनेक प्रकारचे लोक गणुला भेटत होते व अनेक वेगवेगळे सल्ले गणुला देत होते, गणू प्रतिउत्तर तर काही देत नव्हता पण सगळ्यांना एक लहानशी हशी देत होता व तेथून निघून जात होता, 






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

भारताचे संविधान कोणी लिहिले? प्रेम बिहारी नारायण रायजादा/ संविधान सभा/ मसुदा समिती

आपल्या सर्वांना माहीतच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अथक प्रयत्न करून भारतामध्ये जगातील सर्वात मोठी लोकशाही रुजवण्यात यशस्वी झालेत. जर...