रविवार, १८ जुलै, २०२१

मी अधिकारी कसा होणार भाग ५

मी अधिकारी कसा होणार भाग ५
     गणू आता तालुक्याला जाण्याचा विचार करतो, कारण त्याचा अभ्यास बऱ्याच दिवसापासून मागे राहिलेला होता,  आता तालुक्याला जाण्याचा दिवस येतो, गणू जाण्याची तयारी करतो, तेवढ्यात त्याचे बाबा घरी येतात , गणू त्याच्या बाबांना काही पैसे मागतो , त्याचे वडील तसेच चिडलेले असतात, की बरेच वर्षांपासून पोरगा शिक्षण घेत आहे पण अजून पण कोठे जमलेले नाही. व लोकांनी सांगितलेले शिक्षणा विषयी नकारात्मक भावना , या कारणाने गणीचे वडील पण चिडलेले असतात , गणू जेव्हा पैसे विषयी विचारतो की मला जायचे आहे काही रुपये पाहिजे होते, त्याचे बाबा गनुवर रागाने भडकतात कोणते शिक्षण होय तर , 5,6 वर्ष झाले अजुन शिक्षणच चालू आहे काहीजण कधी लागेल, गनुचे वडील असे बोलतच गणू चे मन तुटून जाते, या छोट्याश्या शब्दाचा गनुवर खूप मोठा परिणाम होतो, स्वतःवर असलेला त्याचा विश्वास आता डळ मळीत होत होता, तो पण रागाने म्हणतो जाऊ द्या मी पण शिक्षण घेत नाही, मला पण शिकायचं नाही, सर्वच सोडून देतो , वावरत जात जाईल बस
     
      येवढे बोलून गणू रागा रागात घराच्या बाहेर निघतो, थोड्या वेळाने गनुच्या घरी त्याच्या आई वडिलांच्या त वाद पेटतो की तुम्ही गणुला असे का म्हटले, गानुचे. वडील गानुच्या आई ला समजाऊन सांगतात की घरची परिस्थिती कोणत्या दिशेने जात आहे , घरी पैसे काहीच नाही , पेरण्याचे दिवस आहेत , जवळ असलेल्या पैसेचे बियान आणले , गावातील लोकांचे कर्ज आहे ते वेगळे, माझ टेन्शन मी कोणाला सांगू, हे सर्व गणू बाहेरून ऐकत असतो , गणुला आपली परिस्थिती पाहून अभ्यास करण्याची आणखीनच हिम्मत मिळते , गणुचे वडील तेव्हाच घरातील एक पोते घेऊन गावात फेर फटका मारायला जातात , व विकत घेतलेले बियाणे पुन्हा विकतात व गणुला शिक्षणासाठी पैसे देतात, गणुला गणुला खूप वाईट वाटते की आपण आपल्या आई वडिलांना कोणत्या भाषेत उत्तर दिले म्हणून, गणू मान खाली घालून तालुक्याला निघतो , जातांना त्याची आई त्याला म्हणते , बाबू घरचे टेन्शन नको घेऊ.  तू फक्त अभ्यासावर लक्ष दे , कधी पण पैसे पाहिजे असतील तर मांग, घर , वावर , सर्व तुझ्यासाठीच आहे . तू आमचे टेन्शन नको घेऊ , तू फक्त अभ्यासावर लक्ष दे , गणू थोड्या वेळाने तालुक्याला निघून जातो , त्याचा अभ्यास पूर्ण करण्यासाठी ..........




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

भारताचे संविधान कोणी लिहिले? प्रेम बिहारी नारायण रायजादा/ संविधान सभा/ मसुदा समिती

आपल्या सर्वांना माहीतच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अथक प्रयत्न करून भारतामध्ये जगातील सर्वात मोठी लोकशाही रुजवण्यात यशस्वी झालेत. जर...