शुक्रवार, ६ ऑगस्ट, २०२१

भारतीय राष्ट्रीय आंदोलन (भाग १)

भारतीय राष्ट्रीय आंदोलन (भाग १)

राष्ट्रीय आंदोलन भाग १

     भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे, माझ्या देशावर माझे प्रेम आहे .

     भारताची प्रतिज्ञा सुरू होत असतांनाच सांगितले आहे की, ' भारत माझा देश आहे ' याचा अर्थ असा आहे की भारताला मी माझा मानतो .आणि हीच भावना प्रतेक भारतीयांच्या हृदयावर राज्य करीत आहे.

     आज जो आपण स्वतंत्र भारतातील हवेमध्ये श्वास घेत आहोत, त्याच स्वतंत्र भारतातील हवेमध्ये श्वास घेण्यासाठी अनेक भारतीय क्रांतिकारकांनी आपल्या जीवनाची आहुती दिलेली आहे . हे आज मिळालेले भारतीय स्वतंत्र किंवा भारतीय लोकशाही ही एक किंवा दोन दिवसात मिळालेली नसून यामागे हजारो लोकांचे बलिदान आहे . भारत तर १९४७ साली स्वतंत्र झाला परंतु हा लढा आज सुद्धा सुरू आहे .

     भारताला स्वातंत्र्य १५ आगस्त १९४७ साली मिळाले . परंतु या स्वातंत्र्यामागे हजारो भारतीय क्रांतिकारकांचे बलिदान आहे. त्यांनी केलेल्या लढाईचे ,  गनिमी कावा असो वा मोर्चे , आंदोलन ई . चा समावेश आहे .
आता आपण महत्त्वाच्या मुद्द्यांकडे वळू :- 

काही मुद्दे :- 
१)   भारत १५ आगस्ट १९४७ साली स्वातंत्र्य झाला . कोणाकडून तर इंग्रजांकडून 

२)  भारतामध्ये इंग्रजांचे आगमन सोळाव्या शतकात म्हणजेच , इंग्रज व्यापार करण्यासाठी भारतात आले (१५९९) व

३)  इ. स. १६०० मध्ये ईस्ट इंडिया नावाची कंपनी स्थापन करून व्यापाराला सुरुवात केली व काहीच कालावधीत ते भारताचे राज्यकर्ते बनले .

आणखी काही मुद्दे या ठिकाणी स्पष्ट करू :-

१)  भारतात इंग्रज येण्याअगोदर  भारत स्वातंत्र्य होता काय :- तर याचे उत्तर नाही असे आहे . त्यावेळी राजेशाही असल्या कारणाने कोणत्या ना कोणत्या राजाच्या अधिपत्याखाली भारत भूमी ही पारतंत्र्यात होती .

२)  इंग्रज येण्याअगोदर भारतामध्ये आपले पाय रोवून बसलेले पोर्तुगिज (१५१०)  सुद्धा होते .

३)  भारतामध्ये सुरुवातीपासूनच बाहेरील प्रांतातील आक्रमणे होत होती. उदा - आर्य , हून , मोघल , ई.

४)  अनेक विदेशी राज्यकर्ते भारतात स्थाईक झाल्याने भारतीयांसोबत त्यांचे रोटी बेटी व्यवहार होत होते 

५)  ज्या प्रकारे रोटी बेटी होत होती त्याच प्रकारे एकमेकांच्या संस्कृती ला सुद्धा मान सन्मान दिल्या जात होता .

६) परंतु इंग्रजांनी व्यापराबरोबरच  राज्यकर्ते सुद्धा झाले, व महत्त्वाचे म्हणजे भारतीयांचा संवेदनशील विषय म्हणजे भरताचा धर्म भारताची संस्कृती यामध्ये इंग्रजांचा वाढत असलेला हस्तक्षेप.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

भारताचे संविधान कोणी लिहिले? प्रेम बिहारी नारायण रायजादा/ संविधान सभा/ मसुदा समिती

आपल्या सर्वांना माहीतच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अथक प्रयत्न करून भारतामध्ये जगातील सर्वात मोठी लोकशाही रुजवण्यात यशस्वी झालेत. जर...