निळावंती कथा भाग २
निळावंती व व्यापारी :-
एक तरुण व्यापारी आपला माल विकून बाजारातून बैलगाडीने घरी जायला निघतो , वाटेत त्याला काही डाकू अडवणूक करून त्यांच्या जवळील धन लुटतात व त्याला जिवानिशी मारण्याचा प्रयत्न करतात, परंतु तो व्यापारी आपला जीव वाचविण्यासाठी जंगलाच्या दिशेने पळत सुटतो , तो धावतांना जंगलाच्या एवढ्या आत मध्ये जातो की तो व्यापारी जंगलातील रस्ता भुलतो. धावताना खूप थकल्याने व रस्ता भुलल्याने तो एका झाडाखाली आराम करतांना झोपून जातो .
व्यापारी व निळावंती यांची भेट व लग्न
त्या व्यापाऱ्याला जेव्हा जाग येतो तेव्हा एक सुंदर मुलगी त्या व्यक्तीच्या शेजारी बसलेली असते , ती तरुणी त्या व्यापाऱ्याची चांगली सेवा करीत असते , त्या व्यापाऱ्याला ज्या ठिकाणी डाकुंनी मारले जेथून रक्त वाहत आहे अशा ठिकाणी निळावंती जंगलातील झाड पाला आणून त्यांचे औषध बनवून त्या जखमेवर लावते व त्या व्यापाऱ्यांचा थकावट पाना काही क्षणातच दूर होतो, त्या तरुणीने घेतलेली काळजी पाहून तिची इतरांना करणारी मदत , परावलंबता पाहून , तिचे कोवळ्या वयातील सौंदर्य पाहून तो तिच्यावर प्रभावित व मोहित होतो व तिला लग्नाची मागणी घालतो , ती मुलगी त्या व्यापाऱ्याला एकाच वेळी सहज पने होकार दित नाही, परंतु त्याने खूप वेळा लग्नाची मागणी घातल्याने ती लग्नासाठी तयार तर झाली परंतु ती काही अटी आपल्या होणाऱ्या नवर्यासमोर मांडते , जसे की लग्नानंतर मी रात्री कुठेही गेली तर माझ्या मागे न येणे ई. तो व्यक्ती त्या मुलीचे म्हणजे निळावंतीचे सर्वच अटी मान्य करतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा