राष्ट्रीय आंदोलन (भाग चार )
भारतीय राष्ट्रीय आंदोलन :-
भारतीय राष्ट्रीय आंदोलनाचे स्वातंत्र्याच्या चळवळीचे महत्त्वाचे तीन कालखंड विभागण्यात आलेले आहेत.
१) मवाळ वादी कालखंड (१८८५ ते १९०५)
२) जहाल वादी कालखंड (१९०५ ते १९२०)
३) गांधी युग (१९२०ते १९४८)
मवाळ वादि कालखंड :-
मवाळ वादी युग म्हणजे स्वतंत्र चळवळीचा प्रारंभीचा काळ (१८८५ ते १९०५) होय. हा काळ म्हणजे चांगले सुशिक्षित लोक व विचारवंतांचा काळ म्हणून ओळखल्या जातो. यांच्यामुळेच माहिती झाली की भारतीयांची आर्थिक पिळवणूक कशी होत आहे . हे राजकीय दृष्टिकोनातून व आर्थिक दृष्टिकोनातून यांनी चांगल्या प्रकारे नवीन भारताचे स्वप्न दाखविले .
भारतीय काँग्रेस या पक्षाची स्थापना १८८५ साली करण्यात आली व तेथूनच मवाळ वादी युगाचा प्रारंभ होतो. १८८५ ते १९०५ पर्यंत मवाळ वादी युग असे म्हणतात.
मवाळ वादी यांचे विचार व कार्य :-
१) मवाळ वाद्याचा संपूर्ण विश्वास हा ब्रिटिशांवर होता.
२) त्यांना वाटत होते की इंग्रजांशिवाय भारतात शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित होणार नाही.
३) इंग्रजांच्या न्यायव्यवस्थेवर विस्वास असल्याने ते भारतीयांसोबत न्याय करतील .
४) ब्रिटिशांकडे अर्ज, विनंती करून थोडे थोडे स्वातंत्र्य घ्यावे. थोड्या थोड्या भारतात सुधारणा करून घ्याव्यात जेणे करून भारतीय स्वातंत्र्य हाताळताना भारतीय पुढारी सक्षम होतील.
इ. स. १९०६ साली झालेल्या ........
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा