शनिवार, ७ ऑगस्ट, २०२१

राष्ट्रीय आंदोलन (भाग तीन) ब्रिटिश सरकार विरूद्ध आंदोलन

राष्ट्रीय आंदोलन (भाग तीन)
ब्रिटिशांविरोधात आंदोलन करण्यामागील काहीं कारणे :-

१)  ब्रिटिश हे महत्त्वाकांक्षी असल्याने त्यांनी भारतात व्यापार करण्याबरोबरच राज्य करण्याचे स्वप्न सुद्धा पाहिले .

२)  भारतातील अमाप संपत्ती  त्यांनी स्वतःच्या देशामध्ये हस्तांतरित केली

३)  ब्रिटिशांनी भारतातील धार्मिक तसेच संस्कृतीतील परंपरांमध्ये दुरुस्ती करण्याचे शक्य ते प्रयत्न केले 
उदा - बालविवाह , सतीप्रथा, वर्णभेद ई. 

४).  ब्रिटिश सैन्यामध्ये भारतीय सैनिक आणि ब्रिटिश सैनिक यांमध्ये होत असलेला भेदभाव , असे अनेक कारणे सांगता येतील.


ब्रिटिश शासनाविरोधात झालेले विद्रोह
१)  चोरो विद्रोह :- 
     बिहार मधील पलामु जिल्हातील कंपनी आणि तेथील जमीन दारांनी जबरदस्तीने जमिनीवर कर बसवून जमिनी बळकावण्याचा प्रयत्न केला . तेव्हा तेथील स्थानिक भारतीयांकडून , शेतकऱ्यांकडून ब्रिटिशांविरोधात विद्रोह उभारण्यात आला.

२)  सन्यासी विद्रोह :-
     सन्यासी विद्रोह हा बंगाल प्रांतात झालेला विद्रोह आहे. धार्मिक तिर्थस्तळी यावर करण्यात आलेला प्रतिबंध त्यावर लादण्यात आलेला अवाजवी वाढविले कर  या विरोधात तेथील सन्यासी वर्गाने आपल्या सोबतीला सैनिक व तेथील भारतीयांना घेऊन ब्रिटिश सरकार विरोधात बंड पुकारल्या गेला हा विद्रोह ४० ते ५० वर्ष सुरू राहिला परंतु ब्रिटिशांनी हा विद्रोह दडपून टाकला. 

३) कूका विद्रोह :- 
     या आंदोलनाची सरुवात जवाहरमल भगत व त्यांचे शिष्य यांनी मिळून बंगाल मध्ये बंगाल मध्ये विद्रोहला सुरुवात केली . खरे तर हा विद्रोह ब्रिटिशांविरोधात नसून शीख धर्मामध्ये असलेल्या रुढी, परंपरा , अनिष्ट चालीरीती , अंधविश्वास या विरोधात उभारलेली लढाई होती. परंतु ब्रिटिशांचे विस्तार वादी धोरण लक्षात घेता ब्रिटिशांनी आपले पाऊल पंजाब प्रांतकडे वळविले . आता धार्मिक सुधारणेसाठी सुरू केलेली चळवळीला राजकीय वळण लागले व ब्रिटिश विरोधात आंदोलनाला सुरुवात झाली.

४)  पड्यागोरांचा विद्रोह :-
     हा भारतातील ब्रिटिशांच्या विरोधातील सर्वात मोठा विद्रोह समाजाला जातो . त्या मागील कारणे पण तसेच आहेत. दक्षिण भारतातील जे राजे होते त्यांनी इंग्रजांच्या अधिपत्याखाली राहणे पसंत केले नाही व त्यांनी एक होऊन इंग्रज विरोधात आपले सैनिक आपला लढा उभा करून ब्रिटिशांविरोधात आवाज उभा केला व विद्रोहाला एक मोठा आकार देऊन लढा उभा केला . या विद्रोहाचे नेतृत्व कट्टाबोम्म नायकान या शूरवीर पाडज्ञाने केले .
     ब्रिटिशांविरोधात उचललेला आवाज व त्याला मिळालेल्या एका विद्रोहाचे स्वरूप व नंतर झालेला नरसंहार असे सत्र हे सुरूच होते, भारतामध्ये अगणित झालेले विद्रोहमुळेच आज भारतात स्वातंत्र्याची व लोकशाहीची हवा वाहत आहे .

     भारतामध्ये झालेले अनेक विद्रोह हे आज मिळालेल्या स्वातंत्र्याचा च एक भाग आहे . त्या विद्रोहांमधील एक महत्त्वाचा विद्रोह म्हणजे १८५७ साली झालेला विद्रोह सरकारच्या विरोधात झालेला बंड. १८५७ साली झालेला ब्रिटिश विरोधातील बंड हा भारतातील पहिले स्वतंत्र युद्ध होते , असे म्हणणे वावगे ठरणार नाही, या स्वातंत्र्य युद्धाची सुरुवात  १० मे १८५७ मध्ये मेरठ या ठिकाणी झाली . एक अग्नी ची चिंगारी पूर्ण जंगलामध्ये वानवा पेठवितो त्याच प्रमाणे १८५७ च्या विद्रोहाने संपूर्ण उत्तर भारत पेटून उठला होता . या बंडाची सुरुवात मंगल पांडे या क्रांतिकारानेच केलेली होती. आपल्याच वरिष्ठ अधिकाऱ्यावर गोळी झाडून केलेली ही क्रांती होती.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

भारताचे संविधान कोणी लिहिले? प्रेम बिहारी नारायण रायजादा/ संविधान सभा/ मसुदा समिती

आपल्या सर्वांना माहीतच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अथक प्रयत्न करून भारतामध्ये जगातील सर्वात मोठी लोकशाही रुजवण्यात यशस्वी झालेत. जर...