सोमवार, ३ जून, २०२४

भारताचे संविधान कोणी लिहिले? प्रेम बिहारी नारायण रायजादा/ संविधान सभा/ मसुदा समिती

आपल्या सर्वांना माहीतच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अथक प्रयत्न करून भारतामध्ये जगातील सर्वात मोठी लोकशाही रुजवण्यात यशस्वी झालेत. जर संविधान निर्मितीचे कार्य कुण्या धर्मवेड्या व्यक्तीकडे असते तर भारत देशात अराजकता माजवून नक्कीच देश हा विनाश तिकडे वळला असता याचे अनेक उदाहरण आपल्याला देता येतील
       आपण महत्त्वाची आणि थोडक्यात माहिती पाहणार आहोत एक फोटो आपल्याला 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन आणि 26 नोव्हेंबर सविधान दिनला अनेक लोकांच्या व्हाट्सअप स्टेटस वर आणि फेसबुक वर व इतर सोशल मीडियाला दिसतो की भारतीय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले नसून ते प्रेम बिहारी रायजादा यांनी लिहिलेले आहे परंतु त्याच लोकांचे आणखी पण म्हणणे आहे की भारतीय संविधान ची निर्मिती बाबासाहेब आंबेडकर यांनी एकट्यानेच केलेली नसून संविधान हे 284 जणांनी मिळून लिहिलेले आहे आणि त्याच लोकांचे यावर सुद्धा समाधान झाले नाही व त्यांनी पुढे असे म्हणतात की जेव्हा त्यांना (मसुदा समिती अशी कोणती समिती माहित होते) तेव्हा ते म्हणतात की भारतीय संविधानाची निर्मिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली नसून मसुदा समितीमध्ये आणखी सात सदस्य होते आंबेडकरांच्या म्हणण्यानुसार त्या सात सदस्यांनी भारतीय संविधानाची निर्मिती केलेली आहे असेच काही व्हाट्सअप युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थी/ कार्यकर्ते ज्यांना त्यांना सांगत फिरत असतात व त्यांच्या पलीकडे त्यांना काहीही माहिती नसते काही विचारवंत असे पण येतात की  ज्यांनी संविधान किंवा इतर साहित्य वाचन केलेले असणार किंवा नसणार परंतु त्यांचे एक मनाने असते की सविधान ही इतर देशांची पूर्णतः नकल आहे किंवा इंग्रजांच्या कायद्याची नक्कल आहे काही धर्म वेळे लोक किंवा देशभक्तीच्या नावावर जे द्वेष पसरवितात त्यांचे असे म्हणणे आहे की संविधानामध्ये देवी देवतांची चित्रे काढलेली आहेत म्हणून भारत देश हा धर्मनिरपेक्ष नसून संविधान हे हिंदुराष्ट्र बनविण्यासाठी प्रोत्साहन करत आहे आज आपण याच महत्त्वाच्या काही प्रश्नांची उकल करणार आहोत
 
     पहिला प्रश्न पाहू भारतीय संविधानाची निर्मिती बाबासाहेब आंबेडकर यांनी एकट्यानेच केलेली नसून 284 सदस्यांनी हे संविधान मिळून लिलेले आहे?

-->  याची उकल पाहू की संविधान लिहून पूर्ण झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 4 नोव्हेंबर 1948 रोजी संपूर्ण संविधान घटनेचा मसुदा हा संविधान सभेत मांडला या संविधान मसुद्याचे तीन वेळेस वाचन व चर्चा झाल्यानंतर 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताचे संविधान स्वीकृत करण्यात आले संविधानाच्या प्रस्ताविकतेमध्ये सुद्धा या तारखेचा उल्लेख केल्याचे आढळते व त्याच दिवशी या संविधान सभेचे संविधान सभेत उपस्थित असलेल्या 284 सदस्यांनी संविधानावर सह्या केल्या. हे 284 संविधान सभेचे सदस्य यांनी कोणत्याही प्रकारे संविधान लिहिलेले नाही फक्त ते संविधानाची स्वीकृती करतेवेळी उपस्थित होते जसे की गावातील ग्रामसभेला गावातील इतर नागरिक उपस्थित राहिल्यास ते उपस्थित होते म्हणून त्यांच्या सह्या घेतल्या जातात त्याचप्रमाणे संविधान स्वीकृती वेळी 284 सदस्य फक्त उपस्थित होते. त्यांचा व घटना तयार करण्यात परस्पर कोणताही संबंध दिसून येत नाही भारतातील प्रथम व्यक्ती ज्यांनी संविधानावर स्वाक्षरी केली ते म्हणजे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू तर संविधानावर स्वाक्षरी करणाऱ्या प्रथम महिला रेणुका रे या होत्या सर्वात शेवटची स्वाक्षरी भारताचे प्रथम राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी केली.

 आता आपण आपला दुसरा महत्त्वाचा प्रश्न पाहू की -->

      संविधान निर्मितीसाठी मसुदा समितीची स्थापना करण्यात आली होती. त्यामध्ये एकूण सात सदस्य होते म्हणून संविधान हे फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकट्याने लिहिलेले नाही.

... यासारख्या पोस्ट किंवा कमेंट आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळतात किंवा वाचायला मिळतात हे तर आपल्याला सुद्धा माहिती आहे की मसुदा समितीमध्ये एकूण सात सदस्य होते व मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते

      आता या प्रश्नांची आपण संपूर्ण उकल पाहू की...
      प्रथम पाहू की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेत कसे निवडून आलेत. बाबासाहेब आंबेडकर प्रथम बंगालमधून संविधान सभेत निवडून आले परंतु भारताचे फाडणे झाल्यामुळे बाबासाहेब ज्या जागेवरून निवडून आले होते ती जागा पाकिस्तान मध्ये गेली. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर बॉम्बे प्रेसिडेन्सी मधून जेष्ठ कायदे तज्ञ जयकर यांच्या जागेवर निवडून आलेत आणि बाबासाहेब आंबेडकर स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री बनले. आणि त्यांच्यावर भारताची नवीन राज्यघटना लिहिण्याची जबाबदारी सोपविण्यात आली.

      संविधान सभेतील सर्वात महत्त्वाची समिती ज्या समितीवर भारताचे पुढील भवितव्याची जबाबदारी देण्यात आली होती ती समिती म्हणजे मसुदा समिती मसुदा समितीचे अध्यक्ष स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना बनविण्यात आले होते. मसुदा समितीमध्ये एकूण सात सदस्य होते. 
१) डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर (मसुदा समितीचे अध्यक्ष) 

२) एन जी गोपाळ स्वामी अय्यंगार

३) अल्लादी कृष्ण स्वामी अय्यर 

४) सय्यद अहमद सादुल्लाह (आसामचे पंतप्रधान) 

५) डॉ. के. एम. मुंशी 

६) एन. माधवराव 

७) टी. टी. कृष्णमाचारी (डी.पी. खेतान यांच्या मृत्यूमुळे टी. टी. कृष्णमाचारी यांची नियुक्ती करण्यात आली होती) 

     मसुदा समितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना धरून सात सदस्यांची समिती होती. तरीपण बाबासाहेब आंबेडकरांनाच भारतीय  राज्यघटनेचे शिल्पकार किंवा जनक का म्हणतात ते आपण पाहू...

     सात सदस्यांपैकी एका सदस्याचा मृत्यू झाला. त्यामुळे त्या सदस्यांचे पद कितीतरी महिने खाली होते. बाबासाहेब आंबेडकर सर्व सदस्यांपैकी वयाने सर्वात लहान होते त्यामुळे जास्त वय झालेले सदस्य नेहमी आजारी राहत होते. त्यामुळे एका सदस्यांनी आजारपणाचे कारण समोर करून मसुदा समितीचा राजीनामा दिला आणि नवीन सदस्यांची नियुक्ती करणे यामध्ये सुद्धा खूप वेळ गेला आणि महत्त्वाचे म्हणजे की सर्वच सदस्य हे कायदेतज्ञ होते असे सुद्धा नव्हते म्हणून सविधान निर्मितीत बाबासाहेब आंबेडकरांचा सिंहाचा वाटा होता हे नाकारता येणार नाही.

      आता आपण महत्त्वाचा तिसरा प्रश्न पाहू की...

      भारतीय संविधान प्रेम बिहारी रायजादा यांनी लिहिले काय?
--->  सव्वीस नोव्हेंबर संविधान दिवस असो किंवा प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी असो एक मेसेज प्रत्येक ठिकाणी आपल्याला फिरताना दिसतो की भारतीय मूळ संविधान हे बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले नसून प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी लिहिलेले आहे. असे पोस्ट जे वायरल करतात त्यांचे समजू शकतो की त्यांच्या रक्तात आंबेडकर द्वेष ठासून भरलेला आहे. परंतु गुगल सुद्धा हेच सांगतो की भारतीय मूळ संविधान प्रेम बिहारी रायजादा यांनी लिहिलेले आहे. आता आपण या प्रश्नांची उकल करण्याचा प्रयत्न करू...

 (आपण आपल्याला चैनल वर नवीन असाल तर अशीच वेगवेगळ्या विषयावरील महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब नक्की करा व व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट नक्की करा व आपल्याला नवीन व्हिडिओ कशा संबंधित हवा ते सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये सांगा....)

प्रेम बिहारी रायजादा हे संविधान सभेतील 299 सदस्यांपैकी एक होते असे सुद्धा नाही किंवा आपण मागे पाहिलेलेच आहे की भारतातील संविधान निर्मितीसाठी निर्माण करण्यात आलेली मसुदा समिती त्यामध्ये सुद्धा प्रेम बिहारी रायजादा यांचे नाव वाचण्यात आलेले नाही. म्हणजेच याचा अर्थ असा होतो की संविधान सभा किंवा मसुदा समिती यांचा संबंध कोठेही प्रेम बिहारी रायजादा यांच्या सोबत जोडता येणार नाही तर मग प्रेम बिहारी रायजादा कोण आहेत व त्यांनी मूळ संविधान लिहिले अशा पोस्ट का व्हायरल होत आहेत. 

     प्रेम बिहारी नारायण रायजादा हे दिल्लीमधील सेंट कॉलेजमधील शिक्षक होते ते एक उत्तम सुलेखक सुद्धा होते. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी प्रेम बिहारी रायजादा यांची भेट घेऊन भारतीय संविधानाची जी मूळ प्रत आहे म्हणजेच बाबासाहेब आंबेडकरांनी जे मसुदा समितीद्वारे जो मसुदा तयार केला व त्यावर 284 सदस्यांच्या स्वाक्षऱ्या झालेल्या होत्या म्हणजेच मूळ संविधान हे सुलेखन आजच्या भाषेत म्हणायचे झाले तर ( द आर्ट ऑफ कॅलिग्राफी ) संविधान हे सुलेखन द्वारे हस्तलिखित लिहिण्यास सांगितले येथे आपला प्रश्न स्पष्ट झालेला आहे की प्रेम बिहारी रायजादा हे फक्त सुलेखनकार होते त्यांचा आणि भारतीय संविधान निर्मितीचा कोणताही संबंध नाही महत्त्वाचे सांगायचे झाल्यास प्रेम बिहारी रायजादा यांची नेमणूक ही मतदानाद्वारे किंवा विशिष्ट पद्धतीद्वारे केल्या गेलेली नाही तर पंडित नेहरू यांच्या सांगण्यावरून संविधानाचे सुलेखन केले या ठिकाणी अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होऊ शकतो की राजदादा यांची जात कोणती आहे?
      येथे सांगू इच्छितो की रायजादा यांची जात कायस्थ सक्सेना असून उच्च वर्ण किंवा ब्राह्मण यांच्याच बरोबरीती ही सुद्धा एक जात आहे.

      पुढील काही प्रश्नांची उकल पाहण्यासाठी लवकरच पार्ट टू सुद्धा येणार आहे भारतीय मूळ संविधान मध्ये असलेले देवी देवतांचे फोटो हे धर्मनिरपेक्ष देशात हिंदू राष्ट्र बनवण्यासाठी प्रोत्साहन आहे का भारतीय संविधान हे इतर देशांशी नकल आहे का आपण या प्रश्नांचे उत्तर सुद्धा पाहणार आहोत..

शुक्रवार, १० मे, २०२४

भारतीय मूळ संविधानाच्या प्रत वर देवी देवतांचे फोटो

भारतीय मूळ संविधानाच्या प्रत वर देवी देवतांचे फोटो याचा अर्थ संविधान निर्माते हिंदुराष्ट्र या संकल्पनेला प्रोत्साहन देणार होते का? 
या चित्रामध्ये कृष्ण अर्जुनाला मार्गदर्शन करीत आहे    व्हिडिओ लिंक

     खरं म्हणजे भारतीय संविधानात लिहिलेले शब्द आणि भारतीय संविधानात रेखाटल्या गेलेले चित्र यांचा परस्पर कोणताही संबंध येत नाही. भारतीय संविधानात रेखाटलेले चित्रहे फक्त भारताचा प्राचीन इतिहास मध्ययुगीन इतिहास आणि आधुनिक इतिहास या सर्व विषयांना दर्शवतो , या चित्रावरून संविधान सभेत फार मोठा गोंधळ सुद्धा झालेला होता. 
      पंत निरपेक्ष किंवा धर्म निरपेक्ष असलेल्या राष्ट्रातील संविधानात राम कृष्ण यांचे चित्र का ?
--->  मान्यतेनुसार भारतात चार युग आहेत 
१) सतायुग 
२) त्रेतायुगा
३) द्वापरयुग आणि
४) कलियुग

हा मानवाच्या उत्क्रांतीचा इतिहास सांगतो.असा समज आहे. या रेखाटलेल्या चित्रामध्ये सम्राट अशोकाच्या काळातील अशोक चक्र, त्रिमुखी सिंह , घोडा, वाघ, हत्ती, बैल, ई हे चित्र मोहेंजोदडो येथील चित्रासारखे रेखाटलेले आहेत. त्रेतायुग मधील राम लक्षण रावण सीता हनुमान यांचे चित्र दाखविण्यात आले आहेत. कृष्ण हा अर्जुनाला गीता सांगत आहे ते चित्र दाखविण्यात आले. त्यानंतर भगवान बुध्द व त्यांच्या पाच शिष्यांना दाखविले आहे. भगवान महावीर यांची समाधी घेतलेली मुद्रा , गुप्त काळ त्यानंतर मध्ययुगीन इतिहासातील चित्रे रेखाटण्यात आले आहेत जसे की , उदिसा मधील मूर्तिकला , नटराज मूर्ती , महाबलीपुरम मंदिर, त्यानंतर मुघलांचे राज्य अकबर बादशहा , त्यानंतर गुरु गोविंद सिंह, शिवाजी महाराज नंतर ब्रिटिश काळ सुरू होतो. त्यामध्ये टिपू सुलतान आणि महाराणी लक्ष्मीबाई यांचे सुद्धा चित्रे दाखविण्यात आली आहेत. आधुनिक भारतातील चित्रांमध्ये गांधींची दांडीयात्रा, आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे चित्र दाखविण्यात आले, त्यानंतर भारतातील सर्वोच्च पहाड हिमालय पर्वत असे अनेक चित्र दाखविण्यात आले.

     प्रसिद्ध चित्रकार नंदलाल बोस आणि भारतातील प्रथम पंतप्रधान यांची भेट शांतिनिकेतन येथे झाली. तेव्हा पंडित नेहरूंनी नंदलाल बोस यांना एक संधी देण्याची तयारी दर्शविली की, भारतीय संविधानात मूळ प्रती मध्ये चित्रकाढून संविधान च्या सौंदर्यात आणखीन भर पाडावी. संपूर्ण संविधानाच्या पानावर चित्र रेखाटने शक्य नव्हते म्हणून नंदलाल बोस यांनी संविधानात असलेले बावीस भागावर आपल्या कलेची छाप उमटवीली.


     काही नेत्यांची भाषणे म्हणायची किंवा social media वर viral होत असलेली post, comment म्हणायची किंवा आपल्या एखाद्या मित्रासोबत चर्चा होत असताना त्याने असा प्रश्न विचारायचा की आपल्याजवळ त्याचे समाधान कारक उत्तर नसले तर  तो प्रश्न म्हणजे ,.. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान हे संपूर्ण इतर देशांची नक्कल copy आहे . खरं म्हणजे तेव्हा आपल्याजवळ महत्त्वाची माहिती उपलब्ध नसल्याने आपल्याला शांत किंवा चूप राहण्यापलीकडे दुसरा उपाय नसतो.

     भारतीय संविधान इतर देशांची नक्कल आहे किंवा नाही या महत्वाच्या प्रश्नांची आपण उकल करणार आहोत.

कोणत्याही एका गोष्टीची निर्मिती करायची असल्यास त्या गोष्टीची आपणास पूर्णतः माहिती असणे गरजेचे आहे, जर त्या गोष्टीची पूर्वकल्पना न करता किंवा त्या गोष्टीची संपूर्ण माहिती न मिळविता ती गोष्ट निर्माण करणे म्हणजेच वेळ पैसा आणि त्या गोष्टीची निर्माण करतेवेळी लागलेली मेहनत संपूर्ण वाया गमावल्यासारखे होईल.

     एकाद्या व्यक्तीला घर बांधायचे असल्यास घराचा मालक अनुभवी व्यक्तीलाच घर बांधायला देईल किंवा सुंदर इमारत बांधावयाची असल्यास अनुभवी इंजिनियर यांनाच प्रस्ताव पाठविला जाईल ते त्यांच्या अभ्यासा अनुसार किंवा अनुभवा अनुसार आपण किती घरांची निर्मिती अथवा इमारतींची निर्मिती केली या सर्व गोष्टींचा विचार करूनच पुढील घर किंवा इमारत बांधल्या जाईल 

     संविधान निर्मितीच्या वेळेस आपणास वरील गोष्टीचा विचार करणे फार गरजेचे आहे. म्हणूनच संविधान सभेने अश्या व्यक्तीच्या हाती संविधान निर्मितीचे कार्य सोपविली जे भारतातील सर्वात प्रतिभाशाली व सर्वाधिक उच्च विद्याविभूषित व्यक्ती होते, ते म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर
     डॉ बाबासाहेब आंबेडकर हे बहुमुखी प्रतिभाशाली होते ते तळागळातून उभारलेले नेतृत्व होते, अनेक भाषांचे ज्ञान तसेच त्यांची निर्भिळ पत्रकारिता पण होती, त्यांनी अनेक जबाबदाऱ्या पण पार पाडल्या होत्या. म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर मसुदा समितीची जबाबदारी सोपविण्यात आली.

     आता आपला प्रश्न पाहू की , भारतीय संविधान इतर देशांची पूर्णतः नक्कल आहे का ?

आपण वरील उदाहरणांवरून पाहिलेच आहे की, चांगले घर किंवा चांगली इमारत बांधतांना अनुभवी व्यंतीची गरज असते त्याच प्रमाणे भारताचे संविधान लिहिण्यासाठी इतर देशांतील संविधानाचा अभ्यास करणे पण तेवढेच महत्त्वाचे आहे . एक चांगले संविधान निर्मितीसाठी बाबासाहेबांनी जवळपास साठ (६०) पेक्षा अधिक देशांतील संविधानाचा अभ्यास केलेला होता. त्यामधील जे महत्त्वाचे घटक आहेत ज्या घटकांमुळे भारताचे भवितव्य उज्वळ बनू शकते असे काही महत्त्वाचे घटक भारतीय राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आले. सर्वात महत्त्वाची बाब ही की बाबासाहेबांनी ज्या देशांकडून जे महत्त्वाचे घटक घेतले त्या देशांना त्यांचे  संविधानात नाव लिहून त्यांना त्यांचे श्रेय दिले जर बाबासाहेबांनी शब्दांची हेर फेर करून त्या देशांना त्यांचे श्रेय दिले नसते तर कोणाला काय माहिती होणार होते , परंतु येथे बाबासाहेबांचा प्रामाणिक पणा येतो व ज्या ज्या देशांकडून जे जे घेतले त्यांचे नावे पण लिहिली . म्हणून या ठिकाणी भारतीय संविधान हे इतर देशांची किंवा १९३५ च्या कायद्याची पूर्णतः copy किंवा नक्कल आहे असे म्हणणे योग्य होणार नाही.

     वरील प्रमाणे भारतीय संविधान कोणी लिहिले या महत्त्वाच्या प्रश्नांचे उपप्रश्र्न तयार करून आपण त्या प्रश्नाची उकल करून महत्त्वाची माहिती पाहिली जर या विषयी काही महत्त्वाची प्रश्न असतील तर नक्कीच comment मध्ये विचारा व नवीन माहिती पर व्हिडिओ कोणत्या विषयांवर हवा ते सुद्धा कमेंट मध्ये सांगा ....

      असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच नवनवीन माहितीसाठी चॅनल सबस्क्राइब करा व व्हिडिओ लाईक करून प्रतिक्रिया जरूर नोंदवा.  पूर्ण व्हिडिओ लिंक क्लिक

                         नामवंत पवन 

जयभीम  जय संविधान🙏
#IndianConstitution #babaaahebambedkar #संविधान #आंबेडकर #भारत #news #namvantpavan

रविवार, २९ जानेवारी, २०२३

सहदेव भांडळी ( भाग दोन )

सहदेव भांडळी ( भाग दोन ) :-

सहदेव भांडळी ( भाग एक वरून... )
     एके रात्री सहदेव झोपिमध्ये असताना त्याच्या स्वप्नांमध्ये एक दिव्य व्यक्ती येऊन त्याला त्रिलोल ज्ञान कसे प्राप्त करता येईल या विषयी  संबोधन करतांना सांगितले की या - या ठिकाणी जाऊन तेथे एका दिव्य व्यक्तीची व त्रिकाल ज्ञान प्राप्त व्यक्तीची समाधी आहे ती समाधी उकरून मिळालेल्या शरीराची कवठी काढून ती कवठी रोज एका दगडावर घासून त्याचे चूर्ण करावे व पाणी मध्ये मिसळून रोज प्यावे असे रोज केल्याने तुला त्रिकाल ज्ञान प्राप्त होऊन तू विद्वान ज्योतिषी होशील . परंतु या मध्ये एक अट आहे ती अट म्हणजे हे रहस्य कोणालाही न सांगता तुला करावे लागणार व कवठी उगाळून त्याचे पाणी पिताना कोणालाही दिसणार नाहीस .

( त्रिकाल ज्ञान म्हणजे --> भूतकाळ, वर्तमान काळ, आणि भविष्यकाळ या तीनही काळाचे ज्ञान म्हणजे त्रिकाल ज्ञान होय. उदा . एखाद्या व्यक्तीचा इतिहास काय होता , वर्तमानात काय आहे , व तो व्यक्ती भविष्यात काय असणार या सर्वांचे ज्ञान म्हणजे त्रिकाल ज्ञान होय. )

सहदेवाला तेव्हाच जाग येऊन स्वप्नमधील दिव्य व्यक्तीने सांगितलेल्या ठिकाणी सहदेव जाऊन तेथील समाधी उकरतो व कवठीला उगाळून पाण्यामध्ये मिसळून तो पितो. सहदेव रोज मध्य रात्रीला जाऊन कवठी उगाळून पित होता . त्यामुळे त्याला त्रिकाल ज्ञान प्राप्ती होत होती . त्याच्या ज्ञानाची कीर्ती सर्वदूर पसरत होती . सहदेवाची सर्वत्र ज्ञानाची चर्चा ऐकून भांडळी अस्वस्थ होत होती. 

     एके दिवशी भांडळी सहदेवावर लक्ष ठेविते व मध्य रात्रीला सहदेव कुठ जातो म्हणून त्याचा पाठलाग करीते , सहदेव समाधी उकरून व त्यातील कवठी उगाळून पाण्यामधून पित असताना भांडळी ही एका झुडपामागुन पाहते. सहदेवाचे तेथील काम झाल्यावर सहदेव कवठी समाधीच्या ठिकाणी पुरून तिथून निघून जातो . परंतु सहदेवाचा पाठलाग करणारी भांडळी ही समाधी उकरून व त्यामधील  कवठी बाहेर काढून ती पूर्ण कवठी दगडावर ठेचते व कवाठीचा बारीक भुगा बनवून पाण्यामध्ये मिसळून ती पिते  भांडळी एकाच वेळी संपूर्ण कवाठीचे चूर्ण करून पाण्यासोबत पिल्याने त्रिकाल ज्ञान प्राप्त होते . दुसऱ्या दिवशी सहदेव त्या समाधी जवळ जाऊन कवठी शोधतो पण त्याला ती कवठी सापडत नाही , जेव्हा निराश होऊन तो परत घरी येतो तेव्हा घडलेला सर्व प्रकार सहदेवाच्या ध्यानात येतो . पण भांडळी ही आपली लहान बहीणच आहे म्हणून कोणताही अहंपणा न ठेवता सहदेव आपल्या लहान बहीण भांडळी सोबत राहून त्रिलोक विद्या तसेच ज्योतिष शास्त्र चे ज्ञान इतर ज्ञान प्राप्त करतो.

     भांडळी ही परंपरा वाद नाकारणारी तसेच पुरुषी वर्चस्व झुगारणारी होती  हे तिच्या जीवन चरित्रावरून तसेच कथेवरून समजते . व्यासांनी लिहिलेल्या मेघमाला या संस्कृत ग्रंथाचे मराठी प्राकृत भाषेमध्ये भाषांतर भांडळीने केले . तसेच कृषीपरंपरे विषयी , विवाह विषयी आरोग्य विषयी तसेच हवामान , पर्ज्याण्यमान इत्यादी शास्त्रांच्या आधारे केलेले विवेचन तिने मांडलेले आहे .

सहदेव भांडळी (भाग एक)

सहदेव भांडळी ( भाग एक ) :-
      सहदेव भांडळी हा ग्रंथ हवामानाचे निरीक्षण कशा प्रकारे करता येईल, या आधारावर या ग्रंथाची निर्मिती करण्यात आलेली आहे. भारतात प्राचीन काळापासून ज्योतिष विद्या प्रचलनात आहे . हवामान पाऊस पाणी तसेच आपल्या भविष्याविषयी जाणून घेण्याची प्रत्येकालाच उस्तुकाता असते , आपल्या भविष्यात काय होईल तसेच चिन्हांच्या आधारे शुभ किंवा अशुभ समजल्या जाणाऱ्या काही परंपरा आज सुद्धा प्रचलनात आहेत याचं आधारावर निर्मितीस आलेला ग्रंथ सहदेव भांडळी या ग्रंथाविषयी आपण माहिती पाहू

सहदेव भांडळी ही कथा बाराव्या शतकातील असून मार्तंड ज्योतिष नावाच्या एका ब्राम्हण ज्योतिषाला एका शूद्र समाजातील स्त्री पासून झालेली मुलगी व त्या मुलीचा सावत्र भाऊ सहदेव या दोन भाऊ बहिनिपासून सहदेव भांडळी ही प्रसिद्ध कथा ओळखली जाते .

     मार्तंड ज्योतिष नावाचे एक विद्वान ज्योतिषी होते काही कामानिमित्त ते बाहेर गावी गेले असता त्याच दिवशी त्यांना परत गावाकडे जायचे होते परंतु रस्ता हा जंगलातून असल्या कारणाने व त्यांना गावाकडे परत येताना खूप उशीर झाला असल्याने त्यांनी जंगलातील एका झोपडीमध्ये थांबण्याचा विचार केला , त्या झोपडीमध्ये एक मुलगी व त्या मुलीची म्हातारी आई राहत असे . त्या रात्रीला मार्तंड ज्योतिषी खूप अस्वस्त होता त्या म्हाताऱ्या महिलेने मार्तंड ज्योतिषी ला अस्वत असण्याचे कारण विचारले असता , मार्तंड ज्योतिषी सांगू लागला की मला परमेश्वराचे असे काही संकेत मिळाले आहेत की , मी आज ज्या पण महिलेसोबत समागम करून पुत्र प्राप्ती करेल तो पुत्र खूप तेजस्वी होऊन ज्योतिष शास्त्रात खूप मोठे नाव लौकीक करेल पण मी आज या जंगलात अडकलेला असल्या कारणाने त्या संधीचा मला लाभ घेता येणार नाही , हे सांगत असताना मार्तंड ज्योतिषी अस्वस्थ होत होता . हे सर्व ऐकून त्या म्हाताऱ्या महीलेणे आपल्या अविवाहित मुलीकडे बोट दाखवत गर्भधारणा करण्याची परवानगी दिली , दुसऱ्या दिवशी ब्राम्हण आपल्या राहत्या घरी परत आला .

     काही महिन्यांनी त्या झोपडीतील महिलेचा गर्भधारणा होऊन तिला ब्राह्मणापासून मुलगी झाली , आणि सर्वच निराश झाले त्या मुलीचे नाव भांडळी असे ठेवण्यात आले ,  आणि ब्राम्हणाला त्याच्या पत्नीपासून मुलाचा जन्म झाला व त्याचे नाव सहदेव असे ठेवण्यात आले , मार्तंड ब्राम्हणाने त्या मुलीला आपल्याकडेच ठेऊन घेतले व त्या मुलीची ( भांडळी ) ची देखील देखभाल करू लागला .

     मार्तंड ब्राम्हण आपल्या मुलाला सहदेवाला ज्योतिष शास्त्राचे शिक्षण देत असताना त्याच्या शेजारी भांडळी येऊन बसायची व ज्योतिष शास्त्राचे संपूर्ण ज्ञान हे सहदेव पेक्षा अधिक गतीने आत्मसात करायची . एके दिवशी ज्योतिष ज्ञानाचे शिक्षण घेत असताना सहादेवचे व भांडळी चे वडील मार्तंड ज्योतिषी यांचा मृत्यू झाला होता. सहदेवाला त्रीलोक ज्ञान ही विद्या प्राप्त झाले नाही  , म्हणून तो फार दुखी झालेला होता परंतु सहदेवाने दुखी होऊन राहण्यापेक्षा आपल्याला त्रिलोक ज्ञान कसे प्राप्त होईल याचा शोधात राहत होता. एके दिवशी सहदेव त्रीलोकं ज्ञान प्राप्त करण्यासाठी नावाजलेल्या संत पुरुषाच्या शोधात पैठण मधील साधू जवळ जाऊन आपल्या मनातील इंच्या प्रकट केली , परंतु त्या साधूला सुद्धा ही त्रीलोल ज्ञान विद्या प्राप्त झालेली नव्हती म्हणून साधूने असमर्थता दर्शवत सहदेव ला सांगितले की, मला ही विद्या प्राप्त झालेली नाही परंतु माझे गुरु यांना त्रीलोक ज्ञान ही विद्या प्राप्त झालेली होती , परंतु दुर्दैवाने ते आपल्यात नाहीत .

सहदेव भांडळी क्लिक करा..

उर्वरित कथा भाग दोन मध्ये .. 

सोमवार, ७ नोव्हेंबर, २०२२

विद्यार्थी दिवस महाराष्ट्र

बोधिसत्व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळा प्रवेश दिवस हा महाराष्ट्रातील विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.

     महाराष्ट्रातील शिक्षण विभागाने १७ ऑक्टोंबर २०१७ रोजी घेतलेल्या निर्णय मध्ये असे सांगण्यात आलेले आहे की , डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळा प्रवेश दीन निमित्त शाळा कॉलेज तसेच इतर ठिकाणी बाबासाहेब यांचा वैचारिक वारसा जपण्यासाठी व त्यांचे विचार आजच्या विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित लेख, भाषण, व्याख्यान , कविता , तसेच इतर कार्यक्रम आयोजित करून त्यांचा वैचारिक वारसा जपण्याचे कार्य करावे. 

     डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सातारा शहरातील राजवाडा चौक येथील सरकारी शाळा आजची प्रतापसिंग हायस्कूल येथे आजच्या दिवशी म्हणजे ७ नोव्हेंबर  रोजी प्रवेश घेतला होता ( ७ नोव्हेंबर १९०० ) आणि आजच्याच दिवसापासून बाबासाहेबांच्या शैक्षणिक प्रवासाला खरी सुरुवात झाली होती. तेव्हा बाबासाहेबांचे शाळेतील नाव भिवा रामजी आंबेडकर असे रजिस्टर मध्ये लिहिलेले आहे . हा ऐतिहासिक वारसा तेथील शाळेने जपून ठेवला खर तर त्यांचे आभार. 

बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दीन आजचा विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो सर्वच भारतीयांना व आजचे वैचारिक आंबेडकर ज्यांनी बाबासाहेबांचे स्वप्न जिवंत ठेवण्याचे कार्य हाती घेतलेले आहे त्या सर्वांना मानाचा जय भीम व विद्यार्थी दिवसाच्या शुभेच्या 💐💐💐

शुक्रवार, ४ नोव्हेंबर, २०२२

तिचे अधूरे स्वप्न , मराठी संवेदनशील कविता by नामवंत पवन...

तिचे आधुरे स्वप्न
तिचे अधूरे स्वप्न

शरीराचा बाजार मांडला की काय
सौंदर्यच संपुष्टात आले
आलीच गरीबाची मुलगी वयात 
तिच्या बापाच्या हृदयाचे ठोके
संपुष्टात आले...

कोण्या श्रीमंतांची नजर 
पडलीच तिच्यावर तर
तिचे दिवस भरून आले...
केलीच तिने त्याच्याशी 
लग्न करण्याची विनवणी
भर कोर्टात ती वैश्यां असल्याचे
सबुत धाऊन आले...

कोण्या काळी बापाच्या नजरेत 
देवी असलेली मुलगी समाजाच्या गल्लीतून 
जेव्हा हिनवल्या जाते...
सांगा त्या बापाचे काळीज 
कुठ दम तोडते...

सांगा त्या बापाचे काळीज
कुठ दम तोडते...

हसता खेळता परिवार
जेव्हा तुटून जातो
सांगा त्या लेकीची इज्जत
कुठ हरवुन जाते..
स्मशानाच्या चितेवर की
श्रीमंतांच्या खाटेवर..
की अशीच समाजाच्या नजरेत
नीच प्रवृत्तीची जात
होऊन जाते...

की अशीच समाजाच्या नजरेत
नीच प्रवृत्तीची जात होऊन जाते...

तिचा बाप आता 
फारसा काही बोलत नाही
दारू सोडून दुसरे काहीच 
तो पित नाही...

लग्नाचं वय निघून गेलेली मुलगी
शरीराची जेव्हा भूक भागविते
दिवसाप्रमाणे माणसे बदलून जातील
मात्र नवऱ्याचे स्वप्न हे 
तिच्या नजरेत अधुरेच राहते..

मात्र नवऱ्याचे स्वप्न 
तिच्या नजरेत अधुरेच राहते....

     नामवंत पवन... ( अमरावती )
     ८०१०८४४८४३
फोटो :- google

सोमवार, १२ सप्टेंबर, २०२२

जेव्हा मी प्रश्न झालो By नामवंत २ सप्टेंबर २०२२


आताच दनविर होतो , 
आताच याचक झालो
कळलो नाही कधीच कोणाला, 
जेव्हा प्रश्न झालो

या चुपचाप रात्रीची शांतता , 
जेव्हा आवाज देत होती
झाले होते कित्तेक गुन्हे, 
जेव्हा बेईमान मी झालो

रोजच मराया लागतो , 
श्वास तो उधार जींदगाणीचा
मुर्दे पडून सडत होते , 
जेव्हा शांत मी झालो

या जातीत तुझ्या आणि माझ्या
असे काय खास आहे 
तेव्हा तू लाचार धर्मवेडा
तर मी विद्रोही गुन्हेगार आहे

हे भयाण धर्माचे संकट
का छळतोस आम्हाला 
जरी जात लुळी पांगळी माझी
या जातिव्यवस्थेच्या कतील मी झालो

विद्रोह होत होता चारही दिशांनी ,  
रक्तपात होत होता माणसांचा माणसांनी
लेखणीच्या हातांनमध्ये जेव्हा तलवारी दिसल्या , 
बंड करायचा राहुनी गेला थंड मी झालो

कळले नाही कधीच कोणाला 

     नामवंत पवन ...

व्हिडिओ पाहण्यासाठी समोरील लिंक व क्लिक करा    :-    लिंक क्लिक

रविवार, ७ ऑगस्ट, २०२२

कृषी विधेयक / Minimum Suport Price ( MSP ) / तीन बिल / किसान आंदोलन

कृषी विधेयक

     कृषी विधेयक पास होणे से मिनिमम सपोर्ट प्राइस Minimum Suport Price (MSP) रद्द हो सकता है!

Minimum Suport Price ( MSP ) :- बाजार मे फसल की किमतो पर चढ उतार रहता है, उनपर नियंत्रण MSP रखता हैं ! जैसे की , बाजार मे फसलो की किंमत गीरणे से अनाज की किंमत गिरणे से बिमा पॉलिसी जैसे काम कर सकती हैं !

MSP की जरुरत क्यू हैं :- किसन की फसल की जरुरत अच्छी नही मील पाती थी तो किसान ने आंदोलन किया . १९६४ मे फूड ग्रेन्स प्राईज कमेटी बनाई गयी थी जिसका नेतृत्व एल.के. झा ने किया 

* १९६५ मे भारतीय खाद्य निगम ( FCI ) की स्थापना L.K. झा कमेटी के सुझाव पर हुयी ओर अग्रिकल्चर प्राईजेस कमिशन (APC) बना

* FCI वह एजन्सी हैं जो MSP पर अनाज खरीदती हैं ! उसे अपने गोदामो मे स्टोअर करती हैं

* पब्लिक डीस्ट्रीब्युशन सिस्टम (PDS) के जरिये जनता तक कम किमतोपर पहुचाती हैं !

* APC का नाम १९८५ मे बदलकर CAPC किया गया 

सहकारी संघवाद को बढावा , promotion of cooperative federalism

     कृषी और बाजार राज्य सूची मे हैं सूची १४ ओर सूची २८ मे दर्ज हैं

     केंद्र सरकार ने तर्क किया की खाद्य पदार्थ मे व्यापार ओर वाणिज्य समवर्ती सूची का हिस्सा हैं !

     कृषी मंत्री नरेंद्र तोमर ने साफ काहा की नये कानुन से किसानो को खुले बाजार मे अपनी फसल बेचने का विकल्प मीलेगा ! इससे प्रतिस्पर्धी बढेगी ओर किसनो की उपज की बेहत्तर किंमत मिलेगी 

     तोमर ने यह भी काहा हैं की मंडी के बाहर जो ट्रेड होगा ऊस पर कोई टॅक्स नहीं देना होगा!

किसान :-  सरकार मंडियो से बाहर व्यापार छुट दे रही है तो इससे कीसानो को कोई फायदा नहीं होगा बल्की बडे व्यापारियो को फायदा होगा . क्यो की वे लोग बिना टॅक्स चुकाये बाहर से खरिद कर सकेंगे ! इससे एक तरफ किसानो को न्यूनतम समर्थन मूल्य ( MSP ) मिलना बंद हो जायेगा दुसरी तरफ मंडिया ठप्प पडणे लगेगी !

किसान का मानना हैं की उनका अर्थियास पर पुरा भरोसा हैं ! कमिशन एजेंट को राज्य सरकार द्वारा लाईसन्स मिलता हैं ! सरकार उणपर भरोसा करती हैं! तो हम भी उनपर भरोसा कर पाते हैं ! लायसेन्स देणे से पहले सरकार उन कमिशन एजेंट की पुरी जाणकारी इकट्टा कर जांच पडताल के बाद ही लायसेन्स देती हैं लेकीन अब जो नया रूल आया है उसके चलते कमिशन एजेंट के अलावा ये सभी लोग भी काम कर सकेंगे जिनके पास प्रोपर लायसेन्स भी नहीं होगा . ऐसे मे आगे चलकर इन किसानो को फ्रोड लोगो का सामना करना पडेगा.

     संकलन :-  नामवंत पवन प्रभे ८०१०८४४८४३

गुरुवार, १४ एप्रिल, २०२२

आंबेडकर होतो

कधी मंदिर तर कधी मस्जिद होतो कधी चर्च तर कधी गुरुद्वारा होतो या जातीधर्मात कधी रहता ना आले म्हणून कधी आंबेडकर तर कधी बुद्ध होतो नामवंत

जिंदगी का सफर

जिंदगी में कोण किसका साथ देता है मिला गर रास्ते मे हमसफर वो भी पलभर साथ देता है यू तो बिछडणे वाले मिलते हैं हर सफर में कोण कंबक्त जिंदगी के आखरी सांस तक सफर मे साथ देता है नामवंत

रविवार, १० एप्रिल, २०२२

भारतीय संविधान पुन्हा बाबासाहेबांच्या लेखणीतून

भारतीय संविधान पुन्हा बाबासाहेबांच्या लेखणीतून
अश्रूंना पुर यावा
व्हावी अब्रुंची नीलामी
येथे प्रतेक गुन्हेगार मोकाट सुटावा
स्त्रियांची भर चौकात अब्रू लुटावी
एवढेच नाही तर..
घराघरात घुसून इज्जतीचे धींगाणे करावे 

त्या गरीब व शांत स्त्रियांची 
गावागावातून नग्न धिंड काढावी
त्यांच्या शरीरासोबत प्रत्येकाने खेळावे 
मंदिर मस्जिद सर्वच प्रार्थना स्तळांवर बंदी यावी ..

चौका चौकात कब्रे डान्स सुरू व्हावा 
प्रबोधन करणाऱ्यांवर अंधाधुंद गोळ्या झाडाव्यात 
बुद्ध फुले शाहू आंबेडकर पेरियार 
यांच्या मूर्तीची विटंबना व्हावी 
एवढेच नाही तर....
मुर्त्या तोडून फोडून पायदळी तुडवून 
मूर्तीचे व विचारांचे भुगा बनवावे ..

सतीप्रथा व बहुपत्नीत्व या चालीरीती पुन्हा सुरू व्हाव्यात 
घराघरांतून रांडी खाणे सुरू व्हावे 
लहान मोठ्यांनी सिगारेट दारूचे भरपूर सेवन करावे ...
संपूर्ण देशात AIDS , HIV सारख्या बिमारिने थैमान घालावे
एकदिवसाच्या बाळापासून तर १०० वर्षाच्या असणाऱ्या माणसांचे पटापट मूर्दे पडावेत.....

भारतात माणूस नाममात्र शिल्लक रहावा 
तो ही सडलेला कुजलेला मळलेला 
आणि.....
आणि ..... एक दिवस ....
आणि एक दिवस नवीन सूर्य उगवावा 
जेथे माणसामाणसांचा बाट होईल 
त्या माणसांना व त्या जागेला 
तिथेच जाळून खाक करावे ...

एक नवीन पिढी यावी 
एका नवीन संस्कृतीने जन्म घ्यावा 
जेथे माणूस सोडून कोणालाच जागा शिल्लक नसावी ..
जेथे माणसांपासून सुरुवात तर 
माणसानं जवळच शेवट व्हावा
जेथे स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार होईल 
जिथे अन्यायाच्या विरूद्ध चीड तर 
शोषितांच्या विरूद्ध न्याय होईल 
हो एक नवीन संविधान 
नव्या विद्रोहासोबत तयार होईल

एक नवीन लेखणी एक नवीन संविधान तयार व्हावे ....

जेथे सार्वभौम , समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा प्रयत्न व्हावा ...
जेथे सामाजिक आर्थिक राजनैतिक न्याय विचार अभीव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वतंत्र असावे.... 

जेथे संधीची समानता असावी  जेथे व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता एकात्मता असायलाच हवी 
प्रेम दया शांती यांचे संरक्षण करणारी बंधुता असायलाच हवी 

अर्थात... नवीन सामाजिक संरचना नवीन भारताचे संविधान पुन्हा बाबासाहेबांच्या लेखणीतून .., न्याय स्वतंत्र समानता बंधुता यांचे संरक्षण करणारे हवे...

मला भारतीय संविधान ...
       माणसाने माणसासाठी मिळविलेले स्वतंत्र जगण्यासाठी हवे 

हो मला भारतीय संविधान पुन्हा बाबासाहेबांच्या क्रांतिकारी लेखणीतूनच हवे 
हो मला भारतीय संविधान पुन्हा बाबासाहेबांच्या क्रांतिकारी लेखणीतूनच हवे. .   जय भीम

कवी :- नामवंत प्रभे ( अमरावती ) 
मो ८०१०८४४८४३

बुधवार, ३० मार्च, २०२२

विद्रोही साथीदार

विद्रोही साथीदार
जगायचा विचार केला अन् मरणाचा विचार खटकत होता
रक्त हे उसळत होते अन् विद्रोह हा होत होता

आवाज मी ऐकला तेथे निअपराध जीवांचा 
कत्तल खाने फार झाले अन् रंगारंगातील झेंड्याचा माज होता

थाटलो नाही मी तिथेही माझ्यातील पुरुष जागा व्ह्यायचा होता
हे जाती धर्माचे सरकार हर एक बेरोजगार येथे पेटून उठणार होता

सांग मोजणार का तू माझ्यातील बंडखोर पणा 
येथे प्रतेक धार्मिक चळवळीमध्ये संविधानाचा जयघोष होत होता

लपवू नकास चेहरे जाती धर्माच्या नावाखाली 
येथे प्रतेक साथीदार माझा विद्रोही होत होता

येथे प्रतेक साथीदार माझा विद्रोही होत होता ..

नामवंत पवन प्रभे ( अमरावती )
मो ८०१०८४४८४३
#नामवंत_प्रभे  #विद्रोही_कविता

शनिवार, ५ मार्च, २०२२

जात नाही , मराठी विद्रोही कविता

जात नाही
रंगात जात नाही
झेंड्यात जात नाही
सलाम ठोक तिरंग्याला
मग तुझ्या इमानदारीत जात नाही..

कधी कुठे कसा 
लोकशाहीवर बलात्कार होतो
गर्दीत माणसांच्या 
माणसाची जात नाही

घोटाळे रोजच होते
रोजच अब्रू लुटली जाते
स्वयंघोषित देशभक्तांनो
रक्तात तुमच्या देशभक्तीची जात नाही

मागे मागे फिरणाऱ्या 
कुत्र्याच्या वंशजांनो 
घरी भाकरीला पीठ नाही
मग तुझ्या स्वाभिमानात जात नाही

कुठ रडतोस कुठ पडतोस
जाती धर्माच्या नावाखाली माणसाला कुरतडतोस

देशाला धर्म बनव
संविधानाला धर्मग्रंथ 
मग तुझ्या कोणत्याही धर्मात 
मग तुझ्या कोणत्याही गिर्मात
कोणतीच जात नाही


        नामवंत प्रभे 

Video पूर्ण कविता :-.    येथे क्लिक करा

सोमवार, ७ फेब्रुवारी, २०२२

शिक्षण काय आहे , मराठी शैक्षणिक कविता

#शिक्षण
शिक्षण काय आहे

शिक्षण काय आहे
श्राद्ध आणि अंधश्रद्धा 
यांच्या मधोमध विश्वासाची 
रेखाटलेली एक रेख आहे

ज्याला या रेषेतील सामर्थ्य कळले
तोच या ठिकाणी प्रतेक संकल्पनेला विजयी आहे

फेकुनी दे आता ते शस्त्र
फेकूनी दे आता ते धार्मिक झेंडे
आता स्वीकार कर महापुरुषांचा 
त्यांच्या विचारांचा त्यांच्या लेखणीचा 

शिक्षणाचे सामर्थ्य समजून घे
तुझे हक्क तुझे अधिकार जाणून घे
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे 
ते पिऊन एकवेळ डरकाळी फोडून घे 

बंद कर आता तुझ्या शिक्षणाला काळ फासने 
कुत्र्याच्या शेपटी सारखं मागे मागे राहणं

वेळ आलेली आहे
तुझे अस्तित्व दाखवायची 
श्रद्धा आणि अंधश्रद्धा 
यांच्या मधोमध ची रेषा ओळखण्याची .

     नामवंत प्रभे ७ फेब २०२२

सोमवार, २४ जानेवारी, २०२२

दो लब्जो की प्रेमकहाणी (भाग ४) चिडा चीडी की कहाणी

     चिडा अपणी पुरानी जगह पहुचाने के बाद अपने परिवार वालो को धुंढकर एक नये पेड पे नयी जगह एक अच्या सा घोसला बनाता हैं जीस घोसले मे वह पुरा परिवार और चिडा चीडी रह सके ,  

     यहाँ वह चिडी चिडा की हर वक्त याद करती रहती हैं वह चिडा जहा से उडा था ऊस जगह बैठ के ऊसी के इंतजार मे रहती थी ., ऐसे ही बहुत दीन गुजर जाणे के बाद चिडा अपनी चिडी को लाने के लिये वाहा से उड जाता है , बहुत देर तक उड ने के बाद चिडा एक पेड के डाली पे बैठं कर आराम करणे लग जाता है और पास ही के तालाब मे पाणी पिने के लिये वाहा जाता है वह पाणी पिणे ही वाला था तभी पिचे से एक लडका ऊस चिडा को पत्थर मारता हैं और चिडा वही घायल होके कुछ देर तडफने के बाद अपने संसो को छोड देता है , और दुसरी तरफ चिडिया अपने चिडा के इंतजार करते करते खाना पिना छोड देती हैं , और कुछ ही देर मे वह इस दुनिया को छोड देती हैं .....
      हमारे चिडा चिडी की प्यार की कहाणी यही तक है , इस प्यार की कहाणी से हमे एक सीख जरूर मिलती है की हामारा प्यार वही होना चाहिए जीसे आपनी जरुरत हो... जैसे चिडा और चिडी को एक दुसरे की जरुरत थी ..          और एक बात याद से काहणा चाहंगा की कभी भी किसी भी पशू पक्षी पंचि को जान बुझकर पत्थर ना मारे ... किसी की किसमे जान अडकी हुई हो कह नाही सकते...🙏🙏🙏धन्यवाद 
यह कहाणी पुरी सुनाने के लिये क्लिक करे

दो लब्जो की प्रेमकहाणी (भाग ३) चिडा चिडिया प्रेमकहाणी

....बहुत घुमेंगे,  खेलेंगे पुरी जिंदगी साथ रहेंगे ., चिडा भी कहता हैं की हा ये भी ठीक है, जब दोनो वाहा के घोसले से उडणे वाले होते हैं तो चिडा कहता हैं की, हम तो यहा सब छोडके जाणे वाले हैं लेकीन वाहा रहेंगे काहा, खायेंगे क्या हम ऐसा करते हैं की , पहले हम जाते हैं अपना परिवार धूंढते हैं वाहा का अपना घोसला ठीक करते हैं जो तुफान से तूट गया था, फिर हम आपको लेणे आयेंगे ... चिडिया का दिलं नहि मानता था लेकीन वो भी क्या करती... फिर भी चिडिया ने चिडा को रोकणे की नाकाम कोशिश की , फिर चिडा को जाणे के लिये हा कर देती हैं , जब चिडा उडणे वाला होता हैं तब चिडिया कहती हैं की, अगर वाहा सब कुच ठीक ना हुवा तो सब को लेकर याहा आईयेगा ..हम सब साथ मे रहेंगे.., ओर हम आपका याही इंतजार करेंगे .. चिडा थोडा सां मुस्कुराके वाहा से उड् जाता है ., 
..........to be countinue....
कहाणी पुरी सूनानेके लिये लिंक पे क्लिक करे 
https://youtu.be/_ux5k4cdI1c

दो लब्जो की प्रेमकहाणी (भाग २) चिडा चिडिया की कहाणी ..

... शायद वो दोनो एक दुसरे से मोहब्बत करते थे , जो चिडिया थी वह अकेली होणे के कारण अपने दिलं की बात किसिसे भी कर नहीं सकती थी इसिलिये चिडिया अपने जिंदगी से खुश नहीं थी तो दुसरी तरफ चिडा खराब मौसम के कारण वह अपने परिवार से बिछड गया था और वह जब अकेला था उसे किसी की सहारे की जरुरत थी उसी समय चिडिया ने चिडा को साथ दिया.. यही कारण था की चिडा और चिडिया एक दुसरे से मोहब्बत करते थे ... वे एक दुसरे से अलग नहि रहणा चाहते , एक दुसरे के सिवा नहीं रह सकते थे.., 

     लेकीन एक दीन फिर से मौसम अच्या हो जाता है, चिडा को अपने घरवालो की घोसले की , परिवार , जगाह , नदी तलाब,  पेड सब की याद आती है . चिडा अपने दिल की बात चिडिया को बताता हैं की हमे हमारे घर ,परिवार , जगह , नदी, तलाव , पेड , दोस्तों की बहुत याद आ रही है उनके सिवा हमारा दिल कहीं और नहीं लग रहा है , यह बात सुनकर पहले चिडिया नाराज हो जाती हैं, लेकीन थोडी देर मे खुश होकर बोलती हैं की, ठीक हैं  , हम भी आपके साथ आयेंगे , अब आपका जो कुछ हैं वो हमारा ही हैं सुख, दुःख , परिवार , घोसला , वाहा के पेड , नादिया, झरणे ,तालाब हम दोनों वाहा खूब सैर करेंगे , बहुत घुमेंगे , खेलेंगे पुरी जिंदगी साथ रहेंगे.....
..........to be continue..
यह कहाणी you tube पे देखे
All in one with pavan 
https://youtu.be/_ux5k4cdI1c

दो लब्जो की प्रेमकहाणी ( भाग एक ) चिडा और चिडिया की प्रेमकहाणी do labjo ki prem kahani , chida chidiya prem kahani #chida_chidiya #love_story

     हमारी आज की कहाणी कुछ ऐसी ही हैं .., दो लब्जो की प्रेमकहाणी .. यह कहाणी हैं चिडा और चिडिया की. , चिडा और चिडिया यह दोनो एक दुसरे से बेइंतहा प्यार करते थे , बेईंतहा मतलब बहुत ज्यादा प्यार जो एक दुसरे से कभी भी जुदा नहीं होना चाहते थे.

     एक अकेली चिडिया थी जो नदी के किनारे पेड पर एक घोसला करके रहती थी उसका कोई साथी नही था. कोई दोस्त नाही था  . वह रोज सूबह नदी के किनारे बैठती तो कभी पेड के डाली पे बैठतीं . उसके जिंदगी में कुछ भी नया नही था, तो वह अपने जिंदगी से पुरी तरहा से ऊब चुकी थी. वह कभी कभी सोचति थी की , " यार में जी ही क्यो रही हू, " इतना अकेला पण कोई दोस्त नहीं कोई साथी नहीं नाही मे खुल के कीसिसे अपने दिल की बात कर सकती हुं..

     एकदिन किसी दूर जगह का मौसम खराब होणे के कारण एक चिडा उडता हुवा ऊस चिडिया के घोसले के पास आ जाता है, और कुछ ही देर मे उन दोनो मे गहरी दोस्ती हो जाती है..वह दोनो भी एक दुसरे के बारे मे ही सोचते थे वो दोंनो शायद एक दुसरे से मोहब्बत करते थे ...
..........to be continue...
यह कहाणी आप you tube पर भी देखे
All In One With Pavan
https://youtu.be/_ux5k4cdI1c

शुक्रवार, २१ जानेवारी, २०२२

थंडीचा महिना ( वर्हाडी कविता )

थंडीचा महिना
२०२२ चा पहिला महिना 
थंडी पण सरायचा नाव घेईना 
ज्या ज्या घरांची लांबी लांबी भिंती
शेकोटीच कुठ पेटलेली सापडेना 

गल्लीवर उभा राहून 
जेव्हा दूर - दूर मी पाहतो
दुपटाच पांढर वार 
काय माहित कुठ हरविल

ज्याच्या त्याच्या घरातून
आवाज येतो मोठ्याने टिव्हीचा 
थंडी हाय की नाही हाय 
मालुमचत पडत नाही

सकाळी सकाळी दुलाईच
असते लयच गरम - गरम
चहा सोबत खायला 
मिळते ब्रेड अन पाव नरम नरम 
 
घराशेजारच्या झाडावर 
पक्षांची चिवचिवाट असते 
थंडीचा महिना लयच
बहारदार दिसते....

#नामवंत_प्रभे अमरावती 

मंगळवार, १८ जानेवारी, २०२२

अनाथांची आई .., सिंधू ताई सपकाळ

अनाथांची आई
नजरा खिळत होत्या 
पदर जो फाटलेला होता
या बईमान जिंदगी ने
हात माझा पकडला होता

निसटत चालले होते आयुष्य
नकोसे ते दिवस होते
फिरून फिरून या जिंदगाणीला
हळ्यांच्या चोचीसारखे टोचत होते

सांगायचे होते कोणाला
घरच्यांना की दारच्यांना
मृत पावलेले अश्रू माझे
सोबती केले त्या अनाथांना 

फिरत होती पोटासाठी
वासनेच्या नजरा त्या झेलत होती
वाचविण्यासाठी या इज्जतीला
स्मशानात सुद्धा झोपत होती

बाई ची आई होता होता
दुःखाचा पहाड कसा चढून गेली
सोबती न कोणी माझे होते
अनाथांची आई कशी होऊन गेली

  #नामवंताच्या कविता दिनांक ४ जानेवारी २०२२

भारताचे संविधान कोणी लिहिले? प्रेम बिहारी नारायण रायजादा/ संविधान सभा/ मसुदा समिती

आपल्या सर्वांना माहीतच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अथक प्रयत्न करून भारतामध्ये जगातील सर्वात मोठी लोकशाही रुजवण्यात यशस्वी झालेत. जर...