राष्ट्रीय आंदोलन (भाग ८)
क्रांतिकारी चळवळी
भारत स्वातंत्र्यासाठी दोन प्रकारचे आंदोलन चाळविल्या जात होते
१) अहिंसेच्या मार्गाने स्वतंत्र मिळविण्याचा प्रयत्न ( मवाळ गट / गांधी युग)
२) दुसरा गट , हाती शस्त्र घेऊन भारतीय स्वातंत्र्य मिळविणे
भारतीय स्वातंत्र्यासाठी सुरू असलेले क्रांतिकारी आंदोलन :-
भारत देशाला विरतेची परंपरा लाभलेली आहे . त्यामध्ये अनेक क्रांतिकारी सशस्त्र उठाव झाल्याचे दिसून येईल . मग तो १८५७ चा उठाव असो की सन्यासी उठाव, भील विद्रोह , चुआड विद्रोह, संथाल विद्रोह , १८५५ सैनिक विद्रोह , कुका विद्रोह , वंग भंग आंदोलन ई. असे अनेक प्रकारचे उठाव व क्रांतिकारी आंदोलन झाल्याचे दिसून येईल .
१) सूर्य सेन :-
भारतातील क्रांतिकारी चळवळीतील एक महान सेनानी महान क्रांतिकारक सूर्यसेन . यांनी आपल्या जीवनात अनेक क्रांतिकारी कार्यवाही ला शेवटास पूर्ण नेले . सूर्यसेन यांनी इंडियन रिपब्लिकन आर्मी ची स्थापना करून चटगाव मधील विद्रोहाचे नेतृत्व केले.
२) अरविंद घोष :-
अरविंद घोष हे आपल्या युवा अवस्थेत एक क्रांतिकारी होते त्यांनी अनेक स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतलेला होता. परंतु आपल्या जीवनातील अनेक पडावा नंतर त्यांनी सन्यास स्वीकारून योगी बनले व त्यांनी पंडीचरी मध्ये स्वतःचे एक आश्रम स्थापित केले.
३) बटुकेश्र्वर दत्त :-
भारतातील स्वातंत्र्य चळवळीतील एक महान क्रांतिकारी ज्यांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता भगतसिंह यांच्या समवेत ८ एप्रिल १९२९ ला केंद्रीय विधान सभेत बॉम्ब चा विस्पोट केला . आणि नंतर स्वतःहून आत्मसमर्पण केले. बटुकेश्र्वर दत्त यांनी आपल्या जीवनात अनेकवेळा कारावास भोगलेला आहे , त्यांनी भारत स्वातंत्र्य झाल्या नंतर नोव्हेंबर १९४७ साली अंजली दत्त या मुलीशी विवाह करून बिहार मधील पटना या शहरात वास्तव्य करीत होते . या महान क्रांतिकारकांचा मृत्यू २० जुलै १९६५ ला नवी दिल्ली मध्ये झाला.
४) मदनलाल धिंग्रा
भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक महान क्रांतिकारी म्हणजे मदनलाल धिंग्रा . यांनी इंग्लंड मध्ये शिक्षणासाठी गेले असता कर्जन वायली या इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाळुन त्यांच्या हत्तेच्या आरोपाखाली १९०९ च्या सुमारास फाशीवर चढणारा क्रांतिकारी होता.
५) रासबिहारी बोस :-
भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील महान क्रांतिकारी चळवळीतील एक सुप्रसिद्ध नेते . ज्यांनी भारतामध्ये च नाही तर भरता बाहेर सुद्धा क्रांतिकारकांचे संघटन बनविणे सुरू केले . गदर पार्टी असो वा आझाद हिंद फौज यांचे संघटन रासबिहारी बोस यांची महत्त्वाची भूमिका होती .यांनी यांच्या जीवनामध्ये अनेक महत्त्वपूर्ण क्रांतिकारी निर्णय घेऊन आपल्या कार्याचा शेवट केला . परंतु त्यांचे स्वातंत्र्य भारतात स्वास घेण्याचे स्वप्न हे अपूर्णच राहिले .
६) बसंत कुमार बिस्वास :-
भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील अनेक महान क्रांतिकारी मधील एक युवा क्रांतिकारी बसंत कुमार बिस्वास . बंगाल मधील क्रांतिकारी संघटन युगांतर या चळवळीशी जुळल्यानंतर आपल्या क्रांतिकारी विचारांना सिद्ध करण्यासाठी ब्रिटिश अधिकारी लॉर्ड होर्डिंग्ज यांच्यावर बॉम्ब फेकला व आपल्या २० वर्षाच्या युवा अवस्थेत आपला जीव देशासाठी बलिदान दिला. असे क्रांतिकारी आता तरी होणार नाहीत ज्यांच्या मध्ये भारत मातेच्या स्वातंत्र्य साठी एक वेगळीच ज्वाला जळत होतो.
७) वासुदेव बळवंत फडके :-
क्रांतिकारकांची चर्चा होत असेल व वासुदेव बळवंत फडके चे नाव नसेल तर क्रांतिकारी संघटनेची चर्चाच अपूर्ण राहते .
भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक महान क्रांतिकारी नेते म्हणजे वासुदेव बळवंत फडके.ज्यांची स्वतःची च एक वेगळी दुनिया होती यांनी भारतीय इतिहासात आद्य क्रांतिकारी अशी उपमा मिळालेली आहे . भारतात होणारे इंग्रजांचे अन्याय , अत्याचार हे दिवसेंदिवस वाढतच होते. आणि यावर उपाय म्हणजे आपल्या देशात आपणच राज्य करणे . वासुदेव बळवंत फडके यांनी अनेक जाती समूहातील लोकांना एक करून आपली एक क्रांतिकारी फौज निर्माण केली . एक सशस्त्र सेना तैयार केली. त्यांनी एक आपली वेगळीच ओळख निर्माण करून दाखविली १८७९ मध्ये फडके विजापूर मध्ये एका साथीदाराच्या फितुरीमुळे पकडल्या गेले त्यांना काळे पाणी ची शिक्षा देण्यात आली . त्यांच्यावर अन्याय अत्याचार हे वाढतच गेले . शेवटी एडन या कारागृहात त्यांनी या जगाचा निरोप घेतला .
८) चाफेकर बंधू :-
भारताने येवढे क्रांतिकारी दिलेले आहेत की त्यांचे ऋण हे कधीही उतरणार नाहीत . आज स्वातंत्र्य भारतामध्ये जो श्वास घेतल्या जातो तो सर्वच या महान क्रांतिकारकांमुळेच .
चाफेकर बंधू म्हणजे दामोदर हरी चाफेकर , बाळकृष्ण हरी चाफेकर आणि वासुदेव हरी चाफेकर हे तीनही संगे भाऊ चाफेकर बंधू . यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी कशाची ही पर्वा न करता आपल्या प्राणाची आहुती दिली.